Marathi News> भारत
Advertisement

गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती!

Ahemdabad  Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं.

गुजरातमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, अनेक प्रवाशांच्या मृत्यूची भीती!

Ahemdabad Plane Crash News in Marathi: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं. 132 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते. अनेकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. 

गुजरातमधील अहमदाबाद येथून एक अतिशय वाईट बातमी समोर येतेय. गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे वृत्त आहे. टेकऑफ दरम्यान विमान कोसळले.

त्यानंतर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरलेले दिसले. विमानात 242 प्रवासी होते असे सांगण्यात येत आहे. नुकसानीची माहिती लवकरच समोर येईल.

दुसरीकडे, आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

अपघाताचे कारण आणि नुकसानीची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही वेळातच ते मेघानीनगर परिसराजवळ कोसळले. मेघानीनगर हे विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे.

 

Read More