Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये सुरु असणाऱ्या अतिमुसळधार पावसाच्या सत्रात एका मोठ्या संकटामुळं नव्यानं या भागात थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथं असणाऱ्या धराली गावातील खीरगंगा इथं ढगफुटी झाल्यानं प्रचंड पूर आला आणि या पुराच्या पाण्यामध्ये गावंच्या गावं आणि स्थानिकांना गिळंकृत केल्याची धक्कादायक दृष्ट समोर आली आहेत.
काही कळायच्या आतच पाण्याचे अतिप्रचंड लोट वाहत आल्या कारणानं येथील अनेक हॉटेलं, घरं उध्वस्त झाली, तर आलेल्या या संकटाच्या रुपानं समोर मृत्यू पाहून काहींनी एकच आक्रोश केला. या ढगफुटी आणि नंतर आलेल्या पुरामध्ये धराली बाजार पूर्णपणे उध्वस्त झालं असून, अद्याप मृतांचा आकडा मात्र समोर आलेला नाही.
Shocking and dangerous visuals from Uttarkashi! Massive flood in the Khir Ganga river has brought debris and sludge, creating havoc in Tharali village. Many feared trapped. Praying for everyone’s safety. pic.twitter.com/jcYo70w9CY
— Nikhil saini (@iNikhilsaini) August 5, 2025
उत्तराखंडमधील उत्तरकाशी इथं ढगफुटी झाल्यानं गंगोत्री धाम आणि मुखवा नजीक असणाऱ्या धराली गाव इथं मंगळवारी सकाळच्या सुमारास जलप्रवाहांनी रौद्र रुप धारण केलं आणि पाहता पाहता पाण्याचे हे लोंढे मैदानी भागांच्या दिशेनं वाटेल येईल ते नष्ट करत पुढे आले. ज्यामुळं प्राथमिक स्तरावर जिवीत आणि वित्तहानी झाल्याची माहिती समोर येत आहे.
ढगफुटी झाल्यानंतर नाल्यातील पाण्यानं रौद्र रुप धारण केलं आणि पुढं हे पाणी अतिप्रटंड वेगानं नदीच्या पात्राला जाऊन मिळालं. जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेल्या माहिकीनुसार सध्या घटनास्थळावर बचावकार्याला वेग आला असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात येत आहे. सदर घटनास्थळ चारधाम यात्रास्थळांमधील गंगोत्री धामनजीर असून गंगा नदीच्या शीतकालीन प्रवाह मुखवाच्या अतिशय नजीक आहे. इथंच ढगफुटी झाल्यामुळं सध्या स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
प्रशासनानं सध्या या भागातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून, उत्तराखंडमधील हर्षिल क्षेत्रात खीर गाड येथील जलस्तर वाढल्यानं कस्बा धरालीमध्य प्रचंड नुकसान झालं. सध्या पोलीस यंत्रणा, एसडीआरएफ, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथाकांनी घटनास्थळी धाव घेत तिथं वेगानं बचावकार्य सुरू केलं आहे. सध्याच्या घडीला नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावं असं आवाहन यंत्रणांनी केलं असून पुढील काही तास या भागांमध्ये पावसाच्या मुसळधार ते अतिमुसळधार सरी बचावकार्यात अडथळा निर्माण करु शकतात अशीची चिंता व्यक्त केली आहे.
उत्तराखंडमधील ढगफुटीची घटना नेमकी कुठे घडली?
ही महाभयंकर ढगफुटीची घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावातील खीरगंगा परिसरात घडली. ही जागा चारधाम यात्रेतील गंगोत्री धाम आणि मुखवा यांच्या जवळ आहे.
ढगफुटीमुळे कोणत्या प्रकारचे नुकसान झाले?
ढगफुटीमुळे आलेल्या प्रचंड पुराच्या पाण्याने धराली बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. अनेक हॉटेल्स, घरे आणि इतर मालमत्ता नष्ट झाल्या.
ढगफुटीचा परिणाम कसा झाला?
उत्तर: ढगफुटीमुळे खीरगंगा नाल्यातील पाण्याने रौद्र रूप धारण केले आणि हे पाणी प्रचंड वेगाने नदीच्या पात्रात मिसळले. यामुळे मैदानी भागात पाण्याचे लोंढे येऊन सर्वकाही नष्ट झाले.