Marathi News> भारत
Advertisement

नवरा-नवरीचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांना का येतोय राग? पाहा VIDEO

खरंच हे नवीन जोडपं आहे की आणखीण काही, VIDEO पाहून तुम्हीच सांगा 

नवरा-नवरीचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांना का येतोय राग? पाहा VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ नवीन लग्न झालेला जोडप्याचा आहे. हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांना राग येतोय. नेमंक या घटनेत काय झालंय ते जाणून घेऊयात. 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून सर्वंच अवाक झाले आहेत. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, नवरा आणि नवरी यांच्या वयात थोडाफार फरक असतो. यापैकी काही जोडप्यांमध्ये खूप कमी, तर काहींमध्ये खूप जास्त फरक असतो. जुन्या काळात असे वयाचे अंतर पाहायला मिळायचे, मात्र आता क्वचितच पाहायला मिळते. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुन्या काळातील त्या वयातील अंतराची आठवण करून देत आहे.

व्हिडिओत काय?
व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक अतिशय सुंदर नवरी बसलेली दिसत आहे आणि हसत आहे. यादरम्यान, ती तिच्या शेजारी बसलेल्या वृद्ध व्यक्तीला I LOVE YOU म्हणताना दिसतेय. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की तो तिचा नवरा आहे. या नवऱ्याच्या शेजारी नवरी रोमँटिकपणे आपलं प्रेम व्यक्त करत आहे. मात्र हे जोडपे वधू आणि वर आहे याची पुष्टी झालेली नाही.

दरम्यान हा व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. तसेच अनेकांनी हार्ट तुटल्याची इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ संध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.  

Read More