Marathi News> भारत
Advertisement

Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या एका निर्णयामुळं आता परवडणाऱ्या दरात करा वाहन खरेदी; EV साठी काय आहे तरतूद?

Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौफेर व्याप्ती असणारा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये वाहन क्षेत्रापासून आयकर अशा कैक घोषणा त्यांनी केल्या.   

Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या एका निर्णयामुळं आता परवडणाऱ्या दरात करा वाहन खरेदी; EV साठी काय आहे तरतूद?

Budget 2025 : मागील काही वर्षांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ सामान्यांच्या खिशाला चाप लावताना दिसत होती. परिणामी अनेक वाहनधारक आणि वाहन खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनीच इलेक्ट्रीक वाहनांकडे आपला मोर्चा वळवला. ही संपूर्ण स्थिती पाहता आणि भविष्यातील काही मुद्द्यांचा आढावा घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या 2025 - 26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात विशेष घोषणा केल्या. 

इलेक्ट्रिक व्हीकल्ससाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खास घोषणा करण्यात आली. देशभरात सध्या इलेक्ट्रिक व्हीकल्सची मागणी सातत्यानं वाढत असल्यामुळं या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीवरील कस्टम ड्यूटी अर्थात अबकारी करात सवलत देण्याची घोषणा केली. 

हेसुद्धा वाचा : Income Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...

 

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळं इथून पुढं इलेक्ट्रीक वाहनांची किंमत आणखी कमी होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. देशभरात ईव्ही बॅटरीवरील कर कमी करत घरगुती बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगला वाव मिळणार आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार इलेक्ट्रॉनिक सामानांवरील अबकारी कर घटवण्याची घोषणा करण्यात आली. कोबाल्ट पावडर, लिथियम आयर्न बॅटरी वेस्ट, स्क्रॅप आणि 12 इतर महत्त्वाच्या खनिजांवर असणारा मूळ अबकारी करही पूर्णत: हटवला. 

 

Read More