Budget 2025 Viral Memes : मोदी सरकार (Modi 3.0) तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या असतानाच अखेर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत देशाचा बहुप्रतिक्षित अर्थसंकल्प सादर केला. प्रचंड अपेक्षांच्या गर्दीतच अर्थमंत्र्यांनी हे मुद्दे सर्वांसमोर मांडले आणि यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाला अनुसून काही महत्त्वाच्या तरतुदींची घोषणा केली.
संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये सर्वात लक्षवेधी वळण ठरलं ते म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स (Income Tax) संदर्भातील घोषणा. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. जिथं त्यांनी 12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला करमुक्त घोषित केलं.
अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनं अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. जाणकारांच्या मते केंद्राचा हा निर्णय म्हणजे कर प्रणालीमधील एक महत्त्वाचे बदल सूचित करत असून, सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी घेतला गेला आहे.
इथं अर्थमंत्र्यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केलेली असतानाच तिथं सोशल मीडियावर अनेक मुद्दे ट्रेंड होऊ लागले. निर्मला सीतारमण म्हणू नका, मोदी सरकार म्हणू नका किंवा मग आर्थिक फायदा म्हणू नका. नेटकऱ्यांची कल्पनाशक्ती चाळवली आणि एकाहून एक सरस असे मीम्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. कोणी चित्रपटांमधील दृश्यांचा आधार घेतला, तर कोणी फक्त प्रतिक्रिया आणि Reel मधील काही संदर्भ देत आनंद व्यक्त केला.
NO INCOME TAX UPTO RS LAKH #IncomeTax #NirmalaSitharaman pic.twitter.com/u7b80MrB1j
— Ankita (@Lusifer__Girl) February 1, 2025
Amazing 12 lac tak tax free
— Lata Agarwal (@_LataAga1) February 1, 2025
This budget is for the middle class..#Budget2025 #BudgetSession2025 #NirmalaSitharaman #IncomeTax
Middle class reaction pic.twitter.com/7e21tsgDLV
Nirmala Sitharaman : No Income payable on income of up to Rs 12,00,000 in the New Tax Regime
— Mr Chandan Bharadwaj (@sonofdnmahatha_) February 1, 2025
Giant Tax Relief For Middle Class: No Income Tax Up To Rs 12 Lakh
This is awesome. No tax till the income of Rs.12 lakh . #Budget2025 | #IncomeTax | #बजट2025 pic.twitter.com/8W29HxLdqK
वित्त मंत्री निर्मला सीतारमण का ऐलान 12 लाख तक की आय पर कोई टैक्स नही लगेगा
— मारवाड़ी बालक (@marwadi__8849) February 1, 2025
नए साल का मिडिल क्लास को सरकार की तरफ से सबसे बड़ा तोफा मोगैंबो खुश हुआ
#Budget2025 #BudgetSession2025 #IncomeTax pic.twitter.com/5orRgpyJV7
Me giving interview after budget 2025#NirmalaSitharaman #IncomeTax #BudgetSession2025 pic.twitter.com/lFgR62Qry4
— Hum Binod (@BinodnotVinod) February 1, 2025
#IncomeTax #NirmalaSitharaman#Budget2025 pic.twitter.com/6RmSqZzUqu
— Raja Babu (@GaurangBhardwa1) February 1, 2025
काही युजर्सनं थेट मोगॅम्बोचाच फोटो पोस्ट करत, 'मोगॅम्बो खुश हुआ' असे संदर्भ असणारे मीम्स शेअर केले. तर, काहींनी '3 इडियट्स'मधील job interview चा सीन शेअर करत, 'पगार किती घेणार.... 12 लाख' असे खळहळून हसू आणणारे मीम शेअर केले. थोडक्यात अर्थमंत्र्यांचा हा निर्णय अनेकांच्याच हिताचा ठरलाय असंच प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे.