Marathi News> भारत
Advertisement

बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या दरात घट, चेक करा ताजे दर

LPG Gas Cylinder Price: बजेट सादर होण्यापूर्वी आज गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या दरात घट, चेक करा ताजे दर

Budget 2025 Latest LPG Gas Cylinder Price: भारतात तेल कंपन्यांकडून व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ठरवल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होतात. यामुळं CNG आणि PNG च्या किंमतीदेखील ठरवल्या जातात. आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळीच सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा सिलेंडरच्या दरात घट केली आहे. तर, OMCs ने विमान इंधनाच्या दरातदेखील वाढ केली आहे. यामुळं विमानप्रवास महाग होऊ शकतो. देशात LPG सिलेंडर आणि ATF च्या नव्या किंमती आज म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. 

आज व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून दरांत 7 रुपयांची घट झाली आहे. या नव्या किंमती शनिवार 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. मात्र घरगुती गॅस दरांत कोणतेही बदल झालेले नाहीत. 

मेट्रो शहरांत 19 किलो सिलेंडरचे भाव

दिल्ली-1797.00 रुपये
कोलकत्ता- 1907.00 रुपये
मुंबई- 1749.50 रुपये
चेन्नई- 1959.50 रुपये

एयरलाइंसला दिलासा, विमानाचे इंधन महागले

एअरलाइन कंपन्यांसाठी एक चांगली बातमी आहे. OMCs ने विमान इंधनाच्या दरात वाढ केली आहे. ATF किंमतींमध्ये 8078.25 प्रति लीटरची वाढ झाली आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये ATF  1401.37 किलो लीटरने स्वस्त झालं होतं. तर डिसेंबरमध्ये १३१८.१२ रुपये प्रति किलो लिटरने वाढ झाली. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर महिन्यातही किमती ₹२,९४१.५/किलो लिटरने वाढल्या होत्या.

मेट्रो शहरांमध्ये एटीएफच्या किमती

दिल्ली- 95,533.72 रुपये

कोलकाता- 97961.61 रुपये

मुंबई- 89,318.90 रुपये

चेन्नई- 98,940.19 रुपये

Read More