Marathi News> भारत
Advertisement

सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया

Budget 2025:  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाता अर्थसंकल्प सादर केला. बजेटमधून सर्वात  मोठा दिलासा सर्वसामान्य नोकरदार वर्गाला मिळला आहे. सरकारने 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे.  12 लाखांपर्यंत नोकरदारांना कोणताही टॅक्स लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन शब्दात बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. 

140 कोटी भारातीयांच्या अपेक्षांचे हे बजेट आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे बजेट आहे. बचत, आणि गुंतवणुक वाढवारे बजेट असून. देशाच्या विकालासा हातभार लावणारे बजेट आहे. बजेट हे सरकारची तिजोरी भरणारे असते. मात्र, हे बजेट याच्या उलट आहे. सर्वसामान्यांचे खिसा नेहमी कसा भरलेला राहील यावर भर देणारे हे बजेट आहे. देशाचे नागरिक देशाच्या विकासात कशा प्रकारे सहभागी होतील यावर भर देणारे हे बजेट आहे.  

देशातील नागरिकांना आत्मनिर्भर बनवणारे हे बजेट आहे. तरुणांसाठी आम्ही अनेक क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. हे विकसित भारताच्या मिशनला चालना देणार बजेट आहे.  हे बजेट फोर्स मल्टीप्लायर (Force Multiplier) आहे. जनतेची स्वप्ने पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आहे.  हा अर्थसंकल्प शक्ती वाढवणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत, गुंतवणूक, उपभोग आणि वृद्धी वाढणार आहे.  देशातील नागरिकांची बचत कशी वाढणार आहे आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होणार आहे या अर्थसंकल्पाने त्याचा खूप भक्कम पाया रचला आहे.

लोककेंद्रित अर्थसंकल्प आणल्याबद्दल मी निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो असे पीएम मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पात सुधारणांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. अणुऊर्जेसाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशाच्या विकासात नागरी अणुऊर्जेचे मोठे योगदान निश्चित होईल.

हा अर्थसंकल्प देशाच्या विकासात योगदान देईल. अर्थसंकल्पात रोजगार क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले आहे. स्वावलंबी अभियानाला गती मिळेल. देशात पर्यटनाला भरपूर वाव देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात एक कोटी हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी 'ज्ञान भारत मिशन' सुरू करण्यात आले आहे.

Read More