Marathi News> भारत
Advertisement

Video : पत्त्याप्रमाणे कोसळली संपूर्ण इमारत, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाचले लोकांचे प्राण

7 मजली इमारत पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली.

Video : पत्त्याप्रमाणे कोसळली संपूर्ण इमारत, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे वाचले लोकांचे प्राण

शिमला : हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये 7 मजली इमारत पत्त्यांच्या घराप्रमाणे कोसळली. ही घटना कच्छी घाटी परिसरात घडली. सुदैवाने, इमारत कोसळण्यापूर्वी रिकामी करण्यात आली होती. यामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. या घटनेवर हिमाचल प्रदेशचे मंत्री सुरेश भारद्वाज यांनी सांगितले आहे की, इमारत कोसळण्याच्या कारणांचा तांत्रिक तपास केला जाईल.

मंत्री सुरेश भारद्वाज यांचे म्हणणे आहे की, जवळपासच्या इमारती ज्या धोकादायक असू शकतात त्यांना प्रशासनाने रिकामी केले आहे. ते म्हणाले की, येथे राहणाऱ्या 8-10 कुटुंबांना सरकारकडून पुनर्वसनासाठी मदत दिली जाईल. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात सात मजली इमारत कशी जमीनदोस्त झाली हे पाहिले जाऊ शकते.

इमारत कोसळली तेव्हा शिमला प्रशासन घटनास्थळी उपस्थित होते. प्रकरणाची माहिती मिळताच उपमहापौर आणि डीसीही घटनास्थळी पोहोचले. शिमलाचे उपमहापौर शैलेंद्र चौहान म्हणाले की, पावसामुळे दर्शन कॉटेज नावाच्या इमारतीचा पाया खूपच कमकुवत झाला होता. लोकांना वेळेवर बाहेर काढण्यात आले. यामुळे जीवित व मालमत्तेचे नुकसान टळले. थोड्याच वेळात इमारत पत्त्यांच्या इमारती प्रमाणे कोसळली.

ही घटना शिमल्यातील कच्छी घाटी परिसरातील आहे. सततच्या पावसामुळे इमारत खूपच कमकुवत झाली होती. प्रशासन यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. इमारत वेळेत रिकामी झाली. सर्व कुटुंबे इमारतीबाहेर गेली होती. त्यानंतर इमारत कोसळली. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.

Read More