Marathi News> भारत
Advertisement

अनिल अंबानींच्या ५ कंपन्यांची विक्री, १७ डिसेंबरपर्यंत खरेदी करण्याची संधी

अनिल अंबानींवर आपल्या ५ कंपन्या विकण्याची वेळ आलीय.

अनिल अंबानींच्या ५ कंपन्यांची विक्री, १७ डिसेंबरपर्यंत खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) कर्जाच्या ओझ्याखाली दबलेयत. त्यांना आपल्या ५ कंपन्या विकण्याची वेळ आलीय. अनिल अंबानी यांनी ADAG च्या पाच कंपन्यांसाठी बोली मागवली आहे. 

अनिल अंबानींच्या ५ कंपन्या विक्रीच्या वाटेवर आहेत. यामध्ये रिलायन्स जनरल इंश्यूरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इश्यूरन्स, रिलायन्स सिक्योरिटीज, रिलायन्स फायनांशियल आणि रिलायन्स एसेट कंस्ट्रक्शनचा समावेश आहे. या पाचही कंपन्या रिलायन्स कॅपिटल(Reliance Capital)सबसिडी कंपन्या आहेत.

१७ डिसेंबरपर्यंत संधी 

डिबेंचर होल्डर्स समितीने कंपनीच्या सब्सिडियरी कंपन्यांना बोलीसाठी १ डिसेंबरपासून वाढवून १७ डिसेंबरपर्यंत केल्याचे रिलायन्स कॅपिटलने म्हटलंय. ज्यांना या कंपन्या खरेदी करायच्या असतील ते १७ डिसेंबरपर्यंत एक्सप्रेशन ऑफ इंट्रेस्ट (EoI)जमा करुन बोली लावू शकतात. इतर कोणत्या अटींमध्ये बदल करण्यात आला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Read More