Marathi News> भारत
Advertisement

बुराडी प्रकरण : नारायण देवींचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती

सर्वात मोठा खुलासा 

बुराडी प्रकरण : नारायण देवींचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती

मुंबई : बुराडी प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. एकाच कुटुंबातील 11 लोकांची आत्महत्याच्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. या प्रकरणातील आता मोठा खुलासा झाला आहे. घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे नारायणी देवी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे. यामध्ये नारायणी देवी यांनी देखील आत्महत्या केल्याचा खुलासा झाला आहे. मिळालेल्या रिपोर्टमध्ये असा खुलासा झाला आहे की, नारायणी देवी यांनी सगळ्यात शेवटी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या या भाटिया कुटुंबात कोणत्याही 12 व्या व्यक्तीचे फिंगर प्रिंट मिळाले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्ली पोलिसांनुसार घरात कुणा बाहेरील व्यक्तीचा वावर असल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र, फॉरेसिंक तज्ञांनी याची शक्यता नाकारली आहे.  

सर्वात मोठा खुलासा 

भाटीया कुटुंबातील सदस्यांच्या शरिरावर, कपड्यांवर आणि फासावर घरातील व्यक्तींव्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील व्यक्तीच्या हातांचे ठसे सापडलेले नाहीत. 2 जुलै रोजी आझाद मेडिकल कॉलेजमध्ये संपूर्ण कुटुंबाचे पोस्टमार्टम रिपोर्ट सापडले. त्यामध्ये म्हटलं आहे की, ललित, भुवनेश आणि टीना यांच्या शरीरावर नारायणी देवीसोबतच प्रतिभा यांच्या देखील हाताचे ठसे आहेत. तसेच यामध्ये खुलासा झाला आहे की, नारायणी देवी यांनी सर्वात शेवटी आत्महत्या केली आहे. शेजारच्यांच्या माहितीनुसार, नारायणी देवींना चालता आणि फिरता येत नसे. 

तज्ञांच्या माहितीनुसार, भाटीया कुटुंबातील सदस्यांनी फास लावून आत्महत्या केली आहे. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता एका कुटुंबातील व्यक्तींनी असं सूत्रबद्ध काम करण कठीण आहे. यांना कुणी तरी तेरावी व्यक्ती मार्गदर्शन करत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 

Read More