Marathi News> भारत
Advertisement

दुर्देवी! 100 फूट खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 45 जखमी

शुभकार्याला निघाले आणि काळानं घात केला, 100 फूट खोल दरीत कोसळली बस, पाहा व्हिडीओ

दुर्देवी! 100 फूट खोल दरीत बस कोसळून भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू 45 जखमी

तिरुपती : शुभ कार्यासाठी घरातून निघाले मात्र काळानं घात केला. भरररस्त्यात काळानं गाठलं आणि सगळंच संपलं. 100 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. शुभकार्याला निघालेल्या वऱ्हाडासोबत काळानं घात केला. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 45 जण जखमी आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य केलं असून जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. 

ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर इथे घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिरुपतीपासून 25 किमी अंतरावर हा भयंकर अपघात झाला. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

ही बस एक शुभ कार्यासाठी निघाली होती. त्यावेळी रस्त्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

Read More