Marathi News> भारत
Advertisement

चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक

सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.

चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक

नवी दिल्ली : सीबीआयने चाईल्ड पोर्नोग्राफीच्या रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.

ग्रुपमधील लोकां धागेदोरे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीशी जोडलेले

सीबीआयने फेब्रुवारीच्या तीसऱ्या आठवड्यात व्हाट्सएम ग्रुपमच्या पाच एडमिनवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गेल्या दोन वर्षात व्हाट्सअॅपवर सुरू असलेल्या एक्स एक्स एक्स नावाचा एक व्हाट्सअॅप ग्रुप उत्तर प्रदेश येथील कन्नौज येथून चालवले जात होते. या ग्रुपचा अॅडमीन निखिल वर्मा नावाच एका २० वर्षी युवक चालवत होता. पदविधर असलेल्या या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय मुंबई येथून सत्येंद्र, ओमप्रकाश चौहान,दिल्लीहून नफीस राजा, जाहिद उर्फ झाकिर आणि नोएडा येथून आदर्श नावाच्या व्यक्तिही ग्रुपमध्ये सहभागी आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने चौकशी सुरू

सीबीआयने केलेल्या चौकशी अहवालात म्हटले आहे की, हे सर्व आरोपी लहान मुलांच्या पॉर्न फिल्म अपलोड करत असत. तसेच व्हाट्सअॅपच्या माध्यमातून ते अनेक लोकांना जोडत असत. चौकशी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हे लोक पॉर्न फिल्मचे शुटींगही करत असत. किंवा दुसऱ्या साईट्सचे व्हिडिओही ग्रुपमध्ये टाकत असत. दरम्यान, सीबीआय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चाईल्ड पॉर्नोग्राफीशी संबंधीत प्रकरणांची चौकशी करत आहे.

Read More