Marathi News> भारत
Advertisement

CBSE 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण! 'असा' तपासा रिझल्ट

CBSE Board 12th Result Latest Updates in Marathi:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2025 चा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. ८८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

CBSE 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण! 'असा' तपासा रिझल्ट

CBSE Board 12th Result 2025 Latest Updates in Marathi: सीबीएसई बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. 13 मे रोजी सीबीएसईने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. तुम्ही सीबीएसई दहावी आणि बारावीचे निकाल cbseresults.nic.in येथे जाऊन डाउनलोड करू शकता.

किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

यावर्षी बारावीच्या परीक्षेत 16,92,794 विद्यार्थी बसले होते त्यापैकी  14,96,307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 18 मार्च रोजी झाल्या, तर बारावीची शेवटची परीक्षा 4 एप्रिल रोजी झाली.

कोणी मारली बाजी? 

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात मुलं की मुलींनी बाजी मारली हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. तर यावर्षी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या उत्तीर्णतेचा टक्का पाहता मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का हा 91.64% आहे, तर मुलांचा 85.70% आहे आणि ट्रान्सजेंडरचा उत्तीर्णतेचा टक्का 100% आहे. यंदाच्या वर्षीचा (२०२५) निकाल 2024 पेक्षा चांगला लागला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांपेक्षा 5.94% जास्त आहे.

खाली दिलेल्या लिंकवर बघू शकता निकाल 

  • cbse.gov.in
  • cbseresults.nic.in
  • results.cbse.gov.in 

डिजीलॉकरवर कसा बघायचा बारावीचा निकाल?

  • 'डिजिलॉकर' अ‍ॅप डाउनलोड करा
  • digiLocker.gov.in वर जा.
  • तुमचा रोल नंबर, वर्ग, शाळेचा कोड आणि ६ अंकी पिन (शाळेने दिलेल्या माहितीनुसार) टाका. 
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल तो भरा.  
  •  तुम्हाला तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.

'उमंग' अ‍ॅपवर कसा बघायचा बारावीचा निकाल?

  • 'उमंग' अ‍ॅप डाउनलोड करा.
  •  अॅप उघडा आणि शिक्षण विभागात जा आणि 'CBSE' निवडा.
  • तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरा. 
  • काही क्षणातच तुम्हाला निकाल दिसेल. 

SMS द्वारे कसा बघायचा बारावीचा निकाल?

  •  मेसेजिंग अॅप उघडा.
  • cbse 12 असे टाईप करा  
  • 7738299899 वर पाठवा
  •  तुमचा निकाल येईल. 
Read More