Marathi News> भारत
Advertisement

CBSE बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय, 2026 पासून वर्षातून दोनवेळा 10 वी बोर्डाची परीक्षा!

CBSE Board Exams 2026: या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल.

CBSE बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय, 2026 पासून वर्षातून दोनवेळा 10 वी बोर्डाची परीक्षा!

CBSE Board Exams 2026: 2026 पासून दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या नियमांना सीबीएसईने मान्यता दिली. ही माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे. सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार आहे. पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मेमध्ये होणार आहे.

पहिल्या टप्प्यात उपस्थिती अनिवार्य

दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य आहे. दुसरा टप्पा हा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी असेल. असे असले तरी अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल.

या निर्णयानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी असतील तर तो दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करून सुधारणा करू शकेल.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमांना मान्यता दिली आहे. ही शिफारस नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (NEP) करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read More