Marathi News> भारत
Advertisement

केंद्रात आज काहीतरी मोठं घडणार? सरकारच्या हालचालींमुळे गूढ वाढलं, 5 ऑगस्ट पुन्हा ऐतिहासिक ठरणार?

2019 आणि 2020 साली 5 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारकडून यंदाही काहीतरी मोठं होणार का? पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट  

केंद्रात आज काहीतरी मोठं घडणार? सरकारच्या हालचालींमुळे गूढ वाढलं, 5 ऑगस्ट पुन्हा ऐतिहासिक ठरणार?

उर्वशी खोना, प्रतिनिधी, दिल्ली

५ ऑगस्ट तारीख जवळ आली की राजकीय वर्तुळात खळबळ उडते. कारण याच तारखेला केंद्र सरकारने आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आणि यंदाही तसंच घडताना दिसत आहे. सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. भाजपामध्ये मोठ्या फेरबदलांची चर्चा आहे, तर संसदेत काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. जम्मू कश्मीरपासून ते मंत्रिमंडळ फेरबदल आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपर्यंत अनेक शक्यता चर्चेत आहेत. 2019 आणि 2020 साली 5 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारकडून यंदाही काहीतरी मोठं होणार का? पाहूयात आमचा विशेष रिपोर्ट

संसदेचं पावसाळी अधिवेशन गदारोळातच सुरु आहे. कधी ऑपरेशन सिंदूरमुळे, तर कधी बिहारच्या मतदार यादीवरून विरोधक आक्रमक आहेत. मात्र याच गदारोळात रविवारचा दिवस दोन महत्त्वाच्या भेटींमुळे लक्षात राहिला.

दोन महत्त्वाच्या भेटी

➤ पहिली भेट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

➤ दुसरी भेट – त्याच दिवशी काही तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा राष्ट्रपतींची भेट घेतली

 

देशाचे दोन सर्वात पॉवरफुल नेते – पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी एकाच दिवशी राष्ट्रपतींशी स्वतंत्र भेट घेतली, आणि यामुळे अनेक शक्यतांना वाव मिळालाय. या भेटींमागे राजकीय अर्थ लावले जात आहेत. सूत्रांच्या मते, या भेटी नियोजित आणि प्रोटोकॉलनुसार झाल्या. म्हणूनच चर्चेचा खरा फोकस 5 ऑगस्टच्या शक्यतांवर केंद्रित झालं आहे. या भेटी फक्त प्रोटोकॉलचा भाग आहेत का, की 5 ऑगस्टसाठी काही भल्यामोठ्या निर्णयांची पूर्वतयारी? कारण ५ ऑगस्ट ही तारीख भाजपसाठी आणि केंद्र सरकारसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. 

 

5 ऑगस्टला नेमकं काय काय घडलं?

- 2019 मध्ये जम्मू कश्मीरचं विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला

- 2020 मध्ये अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन झालं…

- आता 2025 मध्ये पुन्हा एकदा चर्चांचं पेव्हेलियन गरम झालंय.

संसदेचं पावसाळी अधिवेशन गदारोळात सुरू आहे. या सत्रात केंद्र सरकारकडून काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाऊ शकतात, असं बोललं जात आहे. त्याचवेळी, भाजपमध्ये महत्त्वाचे संघटनात्मक बदल होणार असल्याचं संकेत मिळत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. 

 

5 ऑगस्ट 2025 ला काय होऊ शकतं?

1. समान नागरी कायदा (UCC) विधेयक संसदेत सादर होऊ शकतं

2. उपराष्ट्रपती पदासाठी वरिष्ठ मंत्र्याची उमेदवारी

3. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवीन चेहरा

4. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल – बिहार निवडणुका लक्षात घेऊन

5. संसदेत नवीन धोरणं किंवा विधेयकांवर चर्चा

6. जम्मू कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? (सरकारने नाकारलंय) 

 

५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारसाठी राजकीय शक्तिप्रदर्शनाची संधी ठरली आहे. त्यामुळे यावेळी UCC विधेयक किंवा आणखी काही मोठं धोरणात्मक पाऊल टाकलं जाऊ शकतं, अशी जोरदार चर्चा आहे. बिहार विधानसभा निवडणुका जवळ आहेत. त्यामुळे संघटनात्मक बदल – उपराष्ट्रपती निवडणूक, मंत्रिमंडळ फेरबदल किंवा पक्षाध्यक्षपदात नवीन चेहरा – हे सगळं या आठवड्यात घडू शकतं.

दरम्यान, सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय बनलेला मुद्दा म्हणजे – जम्मू कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार का? पण सरकारमधील शीर्ष सूत्रांनी हे स्पष्टपणे फेटाळलं आहे. सध्या तरी केंद्र सरकारच्या अजेंड्यावर असा कोणताही निर्णय नसल्याचं ते सांगतात. रकारमधील टॉप सूत्रांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळली आहे. त्यामुळे या चर्चांना सध्या तरी काही आधार नाही.

दरम्यान, पंतप्रधान जेव्हा परदेश दौऱ्यावरून परततात, तेव्हा परंपरेनुसार ते राष्ट्रपतींना भेटतात आणि त्यांच्या दौऱ्याचा अहवाल सादर करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदींची भेट ही प्रोटोकॉलचा भाग होती. अमित शहांच्या भेटीमागे मणिपूरमधील परिस्थिती आणि राष्ट्रपती राजवटीचे मुदतवाढीचे कारण आहे.

5 ऑगस्टच्या आधी देशाचं राजकारण चांगलंच गरम झालं आहे. काहीतरी मोठं घडणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण ते काय असेल, कोणत्या पातळीवर असेल, आणि त्याचे परिणाम किती व्यापक असतील – हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

FAQ

1)  5 ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारसाठी का महत्त्वाची आहे?
यापूर्वी 5 ऑगस्टला 2019 मध्ये जम्मू कश्मीरचा विशेष दर्जा (कलम ३७०) रद्द करण्यात आला आणि 2020 मध्ये अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाले. या ऐतिहासिक निर्णयांमुळे ही तारीख राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाची ठरली आहे.

2) 5 ऑगस्ट 2025 रोजी काय मोठे निर्णय अपेक्षित आहेत?
5 ऑगस्ट 2025 रोजी खालील शक्यता चर्चेत आहेत:
-समान नागरी कायदा (UCC) विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता.
- उपराष्ट्रपती पदासाठी वरिष्ठ मंत्र्याची उमेदवारी.
- भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवीन चेहरा.
- मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, विशेषतः बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर.
- नवीन धोरणे किंवा विधेयकांवर संसदेत चर्चा.
- जम्मू कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा (हा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे).

3) भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती होऊ शकते?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर नवीन चेहरा येण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read More