Marathi News> भारत
Advertisement

कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, बिटकॉईनवर लागू शकते बंदी

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते.

कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, बिटकॉईनवर लागू शकते बंदी

नवी दिल्ली : मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते.

बिट कॉईनवर बंदी

कॅबिनेट बैठकीत बिट कॉईन सारख्या वर्चुअल करंसीवर देखील बंदी लावली जावू शकते. आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत बॅनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉजिस्ट स्कीम बिल 2018 ला देखील मंजुरी मिळू शकते. या बिलाच्या प्रस्तावानुसार रेगुलेशन नसणाऱ्या डिपॉजिट स्कीममध्ये पैसे जमा केल्यास 2 ते 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. शिवाय दुप्पट रक्कमेचा दंड देखील भरावा लागू शकतो.

चिट फंडवरही निर्णय

चिट फंड अमेंडमेंड बिल 2018 देखील या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळू शकते. महानदी जल वादावर तोडगा काढण्यासाठी ट्रीब्यूनलच्या गठनच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळू शकते. उडिसा सरकारने ट्रीब्यूनल बनवण्य़ाची मागणी केली होती. डॅम सेफ्टी बिल 2018 या कायद्यासाठी प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते.

Read More