Chandra Grahan 2025 in India and Time : 2025 या वर्षात आतापर्यंत दोन ग्रहण लागले आहेत. आता दोन ग्रहण बाकी आहेत. यामध्ये एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहणाचा समावेश आहे. हे दोन्ही ग्रहण सष्टेंबर महिन्यात पंधरा पंधरा दिवसांच्या फरकांनी लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही ग्रहण पितृपक्षाच्या काळात लागणार आहेत. यामुळे लोकांना प्रश्न आहेत की, या ग्रहणाचा पितृपक्षावर, श्राद्धावर काय परिणाम होईल का?
2025मधील हे दुसरं चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी असणार आहे. हा पितृपक्षाचा पहिला दिवस आहे. हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे पूर्ण चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी 9 वाजून 58 मिनिटांना सुरु होईल आणि रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. या चंद्रग्रहणाचा कालावधी हा 3 तास 28 मिनिटं आणि 2 सेकंद असेल. हे चंद्रग्रहण कुंभ रास आणि भाद्रपद नक्षत्रात राहील.
2025 चे शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहेत. हे 2025 चं एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसेल. हाया ग्रहणाचा सूतक काळ ९ तासाचा आहे. 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12 वाजून 58 मिनिटांचा असणार आहे.
दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमा तिथीला सुरु होऊन अश्विन मास अमावास्येपर्यंत असते. या 15 दिवसांत पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल असं म्हटलं जातं. या काळात श्राद्ध, पिंडदान केलं जातं. पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी चंद्रग्रहण आहे. पितृपक्षात अनुष्ठान कायमच सकाळीच केले जाते. चंद्र ग्रहणाचा सूतक काळाचा परिणाम होणार नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत याचा परिणाम असेल.
चंद्रग्रहणाचा भारतावर परिणाम होणार का?
2025 चे शेवटचे चंद्रग्रहण हे भारतावर परिणाम कारक आहे.
ग्रहणाचा काळ काय?
हे चंद्रग्रहण 9 वाजून 57 मिनिटांनी सुरु होणार असून 8 सप्टेंबर रोजी 1 वाजून 26 मिनिटांपर्यंत दिसणार आहे.
सूतक काळ कधी सुरु होईल?
हे चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटे असणार आहे. पण याचा सूतक काळ हा 9 तासच अगोदर सुरु होईल.
गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?
गर्भवती महिलांनी सूतक काळापासूनच कोणतेही काम करु नये. शांतपणे नामस्मरणात हा वेळ घालवावा.
भारतासोबतच आणखी कुठे दिसेल?
भारतासोबतच हे चंद्रग्रहण एशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझिलंड, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )-