Marathi News> भारत
Advertisement

फक्त 6 लाखात मिळणारी भारतातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार; फॅमिलीच काय शेजाऱ्यांनाही फिरायला घेऊन जा...

भारातातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार. फक्त 6 लाखात ही कार खरेदी करता येते. 

फक्त 6 लाखात मिळणारी भारतातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार; फॅमिलीच काय शेजाऱ्यांनाही फिरायला घेऊन जा...

Cheapest Seven Seater Car:  भारतात स्पेशियस कार अर्थात खूप लोकांना बसायला जागा होईल अशा कार्सना मोठी मागणी आहे. अनेक देशी विदेशी कंपन्यांनी भारतीय ग्राहकांची ही गरज लक्षात घेऊन अनेक कार लाँच केल्या आहेत. या सगळ्या कारना भारतातील सर्वात स्वस्त 7 सिटर कार टक्कर देतेय. फक्त 6 लाखांना मिळणाऱ्या या कारला मोठी डिमांड आहे. ही कार खूपच स्पेसियश आहे. या कारमध्ये फॅमिलीच काय शेजाऱ्यांनाही फिरायला घेऊन जाता येईल. 

सेडान किंवा हॅचबॅक कर यामध्ये फक्त चार जणांना बसू शकतात. यामुळे फॅमिली मोठी असेल तर स्पेशियस आणि मोठ्या मोठ्या कार्सची गरज असते. अशीच एक देशी कार बऱ्याच काळापासून मार्केटमध्ये आजही ट्रेंडिगमध्ये आहे. भारतीयांच्या  गरजा लक्षात घेऊन ही कार डिझाइन केली गेली आहे. ही कार म्हणजे मारुती सुझुकी Eeco. ही कार भारतातील बेस्ट सेलिंग कार आहे. कारण, फक्त फॅमिलीच नाही तर व्यवसायासाठी देखील या कारचा वापर केला जातो. 

मारुती इको ही एक बहुउद्देशीय कार आहे. या कारचा वापर व्यावसायिकरित्या देखील केला जातो. तसेच कुटुंब सहलींसाठी देखील ही कार पहिली पसंती असते.  ही कार फक्त 6.10 लाख रुपयांना खरेदी करता येते. या रकमेमध्ये अंदाजे 22,590  रुपये आरटीओ आणि 37,123  रुपये विमा रक्कम जोडली जाते. 
मारुती सुझुकी Eeco ची वैशिष्ट्ये 

मारुती सुझुकी Eeco ही कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पेट्रेल व्हर्जन कारमध्ये  1.2 लिटर पेट्रोल इंजिन मिळते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की या कारचे पेट्रोल मॉडेल 19 किमी प्रति लीटर मायलेज देते. तर, सीएनजी मॉडेल 26.78 किमी प्रती किलो पर्यंत मायलेज देते. 
याशिवाय, या व्हॅनमध्ये 6 एअरबॅग्ज, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, मॅन्युअल एसी आणि रिक्लाइनिंग फ्रंट सीट्स तसेच ईबीडीसह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. 

 

Read More