Marathi News> भारत
Advertisement

मेस्सी आणि रोनाल्डोलाही मागे टाकेल हा कोंबडा, पाहा जबरदस्त व्हिडीओ

कोंबड्यानं आपल्या अंड्यासोबत करतब केलेला पाहून तुम्हीही दोन मिनिटं थक्क व्हाल. 

मेस्सी आणि रोनाल्डोलाही मागे टाकेल हा कोंबडा, पाहा जबरदस्त व्हिडीओ

मुंबई: मेस्सी आणि रोनाल्डोला खेळताना कोणाला पाहायला आवडत नाही. पण या दोघांनाही मागे टाकले असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. चक्क एका कोंबड्यानं या दोघांनाही मागे टाकले. कोंबड्यानं आपल्या अंड्यासोबत करतब केलेला पाहून तुम्हीही दोन मिनिटं थक्क व्हाल. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की कोंबडा आपल्या अंड्यासोबत अक्षरश: फुटबॉल सारखं खेळत आहे. हा कोंबडा खूपच या खेळात तरबेज असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

कोंबडा अंड कॅच पकडण्यातही कुशल आहे. ह्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सुरुवातीला तो डोक्यावर त्यांतर अंगावर मग पंखावर अंड घेऊन त्याच्यासोबत खेळत आहे.

आयपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 14 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका युझरनं हा कोंबडा गेल्या जन्मी फुटबॉल खेळत असावा असंही म्हटलं आहे. 

Read More