Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक : भरधाव ट्रेनसमोर मुलांची स्टंटबाजी

कित्येक तरूण आपल्या जीवाची बाजी लावत स्टंटबाजी करत असतात.  

धक्कादायक : भरधाव ट्रेनसमोर मुलांची स्टंटबाजी

नवी दिल्ली : कित्येक तरूण आपल्या जीवाची बाजी लावत स्टंटबाजी करत असतात. अनेकदा ही स्टंटबाजी त्यांच्या जीवावर देखील बेतते. तरी देखील ही मुलं स्टंटबाजी करत स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. दरम्यान असाच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील बोतियामध्ये मुलांनी भरधाव ट्रेनसमोर जीवघेणा खेळ केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहे. 

व्हाययरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही मुलं रेल्वेच्या पुलावर उभी असल्याचं दिसून येत आहे. काही वेळाने त्या पुलावर भरधाव ट्रेन येते आणि उभी असलेली ही मुलं ट्रेन येत असल्याचं पाहताचं एकापाठो पाठ नदीमध्ये उडी मारताना दिसत आहे. 

शिवाय या स्टंटबाजी करणाऱ्या मुलांना सल्ला देण्याचे सोडून जमलेले अनेक जण हा क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत. व्हिडिओ  व्हायरल होताच रेल्वेने याची गंभीर दखल घेतली आहे. तर याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत 

Read More