Marathi News> भारत
Advertisement

Agusta westland: मिशेलकडून काँग्रेसमधील त्या बड्या नेत्याचे नाव उघड; 'ईडी'चा दावा

काँग्रेसकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.

Agusta westland: मिशेलकडून काँग्रेसमधील त्या बड्या नेत्याचे नाव उघड; 'ईडी'चा दावा

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचार प्रकरणातील मुख्य आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने लाचखोरीचा हिशेब असलेल्या 'डायरी'त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा खुलासा केला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात ही बाब नमूद केलेय. त्यानुसार मिशेलने ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचार प्रकरणात काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सहभाग असल्याची कबुली दिली आहे. संक्षिप्त नावांपैकी 'ए पी' म्हणजे अहमद पटेल, तसेच 'फॅम' म्हणजे फॅमिली असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याशिवाय, इतरही काही संक्षिप्त शब्दांचे अर्थ म्हणजे हवाई दलातील अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आणि तत्कालीन सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावे असल्याचा ईडीचा दावा आहे. 

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी चौथे आरोपपत्र दाखल केले. संबंधित व्यक्तींना लाच म्हणून दिलेले पैसे अत्यंत गुंतागुंतीच्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. या सगळ्यांकडून सातत्याने पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या कारभारात हस्तक्षेप झाल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, काँग्रेसकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून गलिच्छ राजकारण केले जात आहे. जेणेकरून मोदी सरकारचा पराभव  टाळता येईल, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. 

Read More