Marathi News> भारत
Advertisement

सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर बंधनकारक

धूम्रपानास बाय बाय करणं आता आणखी सोपं होणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. 

सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर बंधनकारक

नवी दिल्ली : आता धूम्रपानास बाय बाय करणं आता आणखी सोपं होणार आहे. कारण १ सप्टेंबरपासून सिगरेटच्या पाकिटावर हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयानं या संदर्भात एप्रिल महिन्यात नव्या नियमांची घोषणा केली होती. या नियमांत मोठे बदल करण्यात आले होते. 

या नियमानुसार सिगरेटच्या पाकिटावर धूम्रपान टाळा किंवा क्वेट स्मोकिंग अशा संदेशासह हेल्पलाईन नंबर देण्यात येणारय. १८००-११-२३५६ हा हेल्पलाईन नंबर आहे.  यावर फोन करुन तुम्ही धूम्रपान सोडण्याबाबत मदत घेऊ शकता. यावरुन तज्ज्ञ मंडळी तुम्हाला धूम्रपान सोडण्याबाबत समुपदेशन आणि मार्गदर्शन करतील. अनेक दिवसांपासून ज्यांना धूम्रपान सोडायचंय त्यांना या हेल्पलाईनचा फायदा होईल. याशिवाय सिगारेट आणि सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर धूम्रपान केल्यास कर्करोग होऊ शकतो असा संदेश देणं बंधकारक असणार आहे. 

१ सप्टेंबरपासून सर्व तंबाखूच्या उत्पादनांवर आणि सिगरेट पॅकेटवर राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक असणार आहे.  जेणेकरून जे लोक तंबाखू आणि सिगरेटचा उपयोग करतात त्यांना त्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी मदत मिळू शकते. या व्यतिरिक्त, ८५ टक्के तंबाखू उत्पादने आणि सिगरेट पॅकेटमध्ये छायाचित्रांसह तसेच मजकूर संदेश बंधनकारक आहे. तसेच धोक्याचा इशाराही लिखित स्वरुपात असणार आहे.

Read More