Marathi News> भारत
Advertisement

धरालीत ढगफुटीने थैमान; महाराष्ट्रातील 30 पेक्षा अधिक पर्यटकांशी संपर्क तुटला

धरालीत ढगफुटीने थैमान; महाराष्ट्रातील 30 पेक्षा अधिक पर्यटकांशी संपर्क तुटला

उत्तराखंडमधील धराली परिसरात भीषण ढगफुटी झाली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या आपत्तीनंतर शेकडो पर्यटक बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील तीसहून अधिक जणांचा समावेश असल्याचेही कळते. नांदेडमधील 10, पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील 19 आणि सोलापुरातील 3 पर्यटक या नैसर्गिक आपत्तीमुळे अडकले आहेत. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि पोलिस पथके बचावकार्य राबवत आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते वाहून गेले आहेत तसेच संपर्क यंत्रणाही ठप्प झाली आहे. बेपत्ता पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने तातडीने मदत आणि बचावकार्य वाढवण्याचे आदेश दिले असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. स्थानिक रहिवासी देखील बचाव मोहिमेत प्रशासनाला मदत करत आहेत. ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पर्यटकांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

Read More