वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी दर रचनेत बदल करून निम्न व मध्यमवर्गाला दिलासा देण्याच्या प्रस्तावावर मोदी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. समाजातील या वर्गाला फायदा व्हावा, यासाठी जीएसटी दरांचा आढावा घेण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. आगामी काळात महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार सवलत देणार असल्याचे दिसते. यात टूथपेस्ट, टूथ पावडर, छत्री, 3 शिवणकामाची यंत्रे, प्रेशर कुकर, स्वयंपाकघरातील भांडी, इलेक्ट्रिक इस्त्री, गिझर, लहान क्षमतेचे वॉशिंग मशीन, सायकल, कपडे, पादत्राणे, स्टेशनरी, लस, शेतीच्या साधनांसह इतर वस्तूंचा समावेश असू शकतो.