Marathi News> भारत
Advertisement

CCI ची GroupM, डेंटसू आणि ब्रॉडकास्टर्सच्या ठिकाणांवर छापेमारी, जाहिरातींच्या दरांमध्ये संगनमताचे आरोप

भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) ग्रुपएम, डेन्ट्सू आणि इंटरपब्लिक ग्रुपसह 10 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या कंपन्यांवर जाहिरातींचे दर आणि सवलती निश्चित केल्याचा आरोप आहे.  

CCI ची GroupM, डेंटसू आणि ब्रॉडकास्टर्सच्या ठिकाणांवर छापेमारी, जाहिरातींच्या दरांमध्ये संगनमताचे आरोप

भारतीय स्पर्धा आयोगाने (Competition Commission of India) मीडिया जाहिरातदार कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई केली असून ग्रुपएम (GroupM), पब्लिसिस, डेन्ट्सू (Dentsu) आणि इंटरपब्लिक ग्रुपसारख्या (Interpublic Group) जागतिक जाहिरात कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. मीडिया कंपन्यांशी संगनमत करून जाहिरातींच्या दरांमध्ये हेराफेरी केली जात असल्याचा आरोप आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीसीआय टीमने 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या कंपन्यांवर जाहिरातींचे दर आणि सवलती ठरवण्यात संगनमत केल्याचा आरोप आहे.

भारतीय स्पर्धा आयोगाला ग्रुपएम, डेन्ट्सू आणि इंटरपब्लिक ग्रुप सारख्या मीडिया एजन्सी जाहिरातींचे दर निश्चित करण्यासाठी प्रमुख प्रसारकांसह काम करत असल्याची तक्रार मिळाली होती. . एवढंच नाही तर काही सवलतीही दिल्या जात होत्या. या कंपन्या बाजारातून चुकीच्या पद्धतीने फायदा उचलत होत्या. त्यामुळे स्पर्धेत असणाऱ्या कंपन्यांचं मोठं नुकसान होत होतं.

कोणत्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले?

सूत्रांनी सांगितलं की, हे प्रकरण जाहिरातींचे दर आणि त्यातील सवलतीच्या डीलशी संबंधित आहे. यामुळे जाहिरातदार आणि लहान प्रसारकांचे नुकसान होत होते. सीसीआयने ज्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत त्यात ब्रिटनच्या डब्ल्यूपीपीच्या मालकीची ग्रुपएम आणि टोकियोमध्ये मुख्यालय असलेली जपानची सर्वात मोठी जाहिरात आणि जनसंपर्क कंपनी डेन्ट्सू यांचा समावेश आहे.

याशिवाय, अमेरिकेतील आघाडीची मीडिया एजन्सी इंटरपब्लिक ग्रुप (IPG मीडियाब्रँड्स) आणि ब्रॉडकास्टर्सची संस्था इंडियन ब्रॉडकास्टिंग अँड डिजिटल फाउंडेशन (IBADF) यांचा समावेश आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या पथकाने दिल्ली, गुरुग्राम आणि मुंबईतील सुमारे 10  ठिकाणी छापे टाकले आहेत.

Read More