Marathi News> भारत
Advertisement

इंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबरला काँग्रेसकडून भारत बंदची हाक

सरकारविरोधात काँग्रेसचा एल्गार

इंधन दरवाढीविरोधात १० सप्टेंबरला काँग्रेसकडून भारत बंदची हाक

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांवरून काँग्रेसने सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या १० सप्टेंबरला काँग्रेसने भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. गुरुवारी देखील पेट्रोल २० पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी महागले. यामुळे लोकांमधील असंतोष आणखीनच वाढला आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल 86.91 रुपये प्रतिलीटर आहे. तर डिझेलसाठी 75.96 रुपये मोजावे लागत आहेत.

Read More