Marathi News> भारत
Advertisement

राजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....

अवघ्या काही क्षणांमध्ये फॉलोअर्सचा आकडा लक्षणीयरित्या वाढला आहे.   

राजकारणामागोमाग ट्विटरवरही प्रियांका गांधींची एन्ट्री, फॉलोअर्सचा आकडा पोहोचला....

नवी दिल्ली : काँग्रेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय झाल्याच्या बातमीने अनेक चर्चांना वाचा फोडली. ज्यानंतर सोमवारी थेट उत्तर प्रदेश दौऱ्यावर जात प्रियांकांनी आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शक्तीप्रदर्शनात सहभाग घेतला. इतकच नव्हे तर, आता त्या राजकारणाच्या रिंगणासोबतच सोशल मीडिया वर्तुळातही सक्रीय झाल्या आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून अवघ्या काही मिनिटांमध्येच या अकाऊंटवर फॉलोअर्सचा आकडा झपाट्याने वाढल्याचं पाहायला मिळालं. 

प्रियांका गांधी असा त्यांचा युजर आयडी असून, आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्या इतरांशी आणि विशेष म्हणजे तरुण पिढीशी जोडल्या जाणार आहेत. ट्विटरवरील या अकाऊंटवरुन त्यांनी आतापर्यंत अवघ्या सात अकाऊंटना फॉलो केलं आहे. ज्यामध्ये राहुल गांधी, सचिन पायलट यांचे अकाऊंट असून, काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटचाही यात समावेश आहे. 

fallbacks

प्रियांका गांधी यांची राजकीय धोरणं नेमकी कशी असणार आणि त्यामध्ये सोशल मीडियाची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. फक्त भाषणं किंवा रोड शोच्याच माध्यमातून नव्हे तर, प्रियांका आता त्यांची मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडू शकणार आहेत. त्यामुळे फक्त सेलिब्रिटीच नव्हे तर आता नेतेमंडळीसुद्धा समर्थक आणि त्यांच्यात असणारी दरी कमी करण्यासाठी अगदी सुरेखपणे सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं स्पष्ट होत आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विटर अकाऊंट सुरु करण्यापूर्वी काही दिवस आधीच मायावती यांनीही सोशल मीडियाच्या या जगात पाऊल ठेवलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकांचं वातावरण पाहता आता हे पाऊल नेतेमंडळी आणि त्यांच्या संबंधित पक्षांना कितप फायद्याचं ठरणार याविषयीचं चित्र येत्या काळात स्पष्ट होईल असंच म्हणावं लागेल.  

 

Read More