नवी दिल्ली : 'सरेंडर मोदी', म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागणाऱ्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात indiavschina भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या लष्करांमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल यांनी चीनकडून मोदींचं कौतुक का होत आहे, असा बोचरा प्रश्न उपस्थित केला आहे.
सर्वपक्षीय बैठकीमध्ये मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या विरोधी पक्षांचा तिखट सूर मावळत नाही, तोच गांधी यांनी आणखी एक मुद्दा अधोरेखित करत सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला आहे.
चीनच्या 'ग्लोबल टाईम्स'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्ताचा संदर्भ देत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. 'चीननं आपल्या जवानांना मारलं, चीननं आपल्या हद्दीतील भूखंडाचा ताबा घेतला, मग आता चीन या साऱ्या वागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक का करत आहे', असा प्रश्न राहुल गांधी यांनी मांडला.
'ग्लोबल टाईम्स'च्या या वृत्तामध्ये काही तज्ज्ञांच्या मतांचा हवाला देत मोदींच्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला होता. मोदींच्या याच भूमिकेवर आता प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या राहुल गांधी यांच्या या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणाकडून दिलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
China killed our soldiers.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2020
China took our land.
Then, why is China praising Mr Modi during this conflict? pic.twitter.com/iNV8c1cmal
'मुंबईत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात येईल'
१५- १६ जूनला लडाखच्या Galwan valley गलवान खोऱ्याच चीन-भारतमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर काँग्रेस, राहुल गांधींकडून मोदींवर टीकेचा भडीमार करण्यात सुरुवात करण्यात आली. त्यातच, 'चीनकडून कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही आणि आपल्या कोणत्याही चौकीवर त्यांचा ताबा नाही', या वक्तव्यानंतर तर गांधी यांचे शब्द अधिक धारदार झाल्याचं पाहायला मिळालं.