Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन दिल्लीत सुरू होतंय. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन

नवी दिल्ली : काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन दिल्लीत सुरू होतंय. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालचं हे पहिलंच अधिवेशन आहे.

राहुल गांधींच्या अध्यक्षपदावर प्रतिनिधी अधिकृतपणे शिक्कामोर्तब करतील. २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीनं प्रामुख्यानं या अधिवेशनात चर्चा होणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच अध्यक्ष म्हणून काँग्रेसची रणनिती, काँग्रेससमोरची आव्हानं, संघटन बांधणी याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.

या अधिवेशनात काँग्रेसचे दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. रविवारी संध्याकाळी राहुल गांधी अधिवेशनाच्या समारोपा वेळी मार्गदर्शन करणार आहेत.

Read More