Marathi News> भारत
Advertisement

राहुल गांधी यांच्या जयपूर रोड शोला मोठा प्रतिसाद

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला जयपूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळालाय.

राहुल गांधी यांच्या जयपूर रोड शोला मोठा प्रतिसाद

जयपूर : राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केलेय. राजस्थानमध्ये रोड शोच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिलेय. राहुल गांधी आज राजस्थानमध्ये एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. त्यांनी आज जयपूरमध्ये रोड शो सुरु केला. यावेळी त्यांचे स्वागत प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रमुख सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांनी केले. रोड शोला सुरुवात विमानतळावरुन झाली. रस्त्यावर गुलाबी रंगाच्या फुले रस्त्यावर टाकून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

fallbacks

जयपूर विमानतळ ते रामलीला मैदानपर्यंत १० किलोमीटरचा त्यांचा दौरा आहे. त्यांच्या या दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अन्य नेते सहभागी झाले आहेत. त्यांनी विमानतळावरूनच रोड शोला सुरुवात केली. या रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केलाय. त्यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपला एक संदेश देण्यात काँग्रेस यशस्वी झालेय. ते एक दिवसाच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. 

fallbacks

राहुल गांधी सप्टेंबरमध्येही राजस्थानचा दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीच भाजपने निवडणूक प्रचाराचा बिगुल राजस्थानमध्ये वाजविला आहे. त्यानंतर एक महिन्यानंतर काँग्रेसने प्रचाराचा शुभारंभ केलाय. या रोड शोमध्ये काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन घडवून आणलेय.

Read More