Marathi News> भारत
Advertisement

सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांंकडून सत्य दाबण्याचा प्रयत्न

सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांची पत्रकाराला मारहाण

विरुधुनगर : तमिळनाडुमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका फोटो जर्नलिस्टला मारहाण केली. काँग्रेसच्या सभेत रिकाम्या असलेल्या खुर्च्यांचा फोटो काढल्याने कार्यकर्ते चांगलेच भडकले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याआधी विरुधुनगर येथे झालेल्या सभेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अन्नाद्रमुकचे नेते के. पलानीस्वामी यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांच्यावर टीका केली. 

अन्नाद्रमुक राज्यात एनडीएमधील प्रमुख पक्ष आहे. येथे भाजप, डीएमडीके, पीएमके एकत्र लढत आहेत. तर द्रमुक सेक्युलर प्रोग्रेसिव अलायंस (एसपीए) चं नेतृत्व करत आहेत. ते काँग्रेससोबत लढत आहेत.

Read More