जैसलमेरच्या राजघराण्याने NCERTच्या इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील मराठा साम्राज्याच्या नकाशावर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, पुस्तकात दाखवलेला नकाशा चुकीचा असून तो विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करणारा आहे. हा नकाशा तातडीने पाठ्यपुस्तकातून काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. राजघराण्याचे सदस्य चैतन्यराज सिंग यांनी यासंदर्भात X वर पोस्ट करून आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की इतिहासाचे चित्रण योग्य आणि सत्य असले पाहिजे, अन्यथा भावी पिढ्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल.