Marathi News> भारत
Advertisement

cooking tricks: video घरच्या घरी कसा बनवाल इराणी चहा; 'ही' आहे सोपी रेसिपी

cooking tricks इराणी चहा हा सुद्धा खूप आवडीने प्यायला जाणारा चहा आहे. इराणी चहा ( (Special Irani chai recipe) ) काही ठिकाणी हैद्राबादी चहा देखील म्हटलं जात काही ठिकाणी हैद्राबादी दम चहा सुद्धा म्हणतात. (irani tea recipe) पण सर्व ठिकाणी इराणी चहा मिळतोच असं नाही 

cooking tricks: video घरच्या घरी कसा बनवाल इराणी चहा; 'ही' आहे सोपी रेसिपी

Tea making ideas: चहा आणि भारतीयांचं एक वेगळंच नातं आहे, चहाशिवाय दिवसाची सुरवातच होत नाही असे बरेच जण आपल्या अवती भवती आहेत. भारतीयांसाठी चहा म्हणजे सुख आहे. सध्या तरी हिवाळा सुरु झाला आहे सकाळची कडाक्याची थंडी आणि त्यात वाफाळता चहाचा घोट घेत दिवसाची सुरवात करणं म्हणजे  व्हा क्या बात है! (tea lovers in india)

चहाचे बरेच प्रकार आहेत, ब्लॅक टी, मिंट टी,  ग्रीन टी, लेमन टी, मसाला टी असे अनेक प्रकार आहेत.इराणी चहा हा सुद्धा खूप आवडीने प्यायला जाणारा चहा आहे. इराणी चहा ( (Special Irani chai recipe) ) काही ठिकाणी हैद्राबादी चहा देखील म्हटलं जात काही ठिकाणी हैद्राबादी दम चहा सुद्धा म्हणतात. (irani tea recipe) पण सर्व ठिकाणी इराणी चहा मिळतोच असं नाही काही ठराविक ठिकाणी हा चहा मिळतो,  पण अश्या वेळी इराणी चहा घरच्या घरी बनवू शकता चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef kunal kapoor recipes) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर ही खास रेसिपी शेअर केली आहे. ((How to make irani chai or Hydrabadi dum chai))

इराणी चहालाच काही ठिकाणी 'हैद्राबादी चहा' किंवा 'हैद्राबाची दम चाय' असंही म्हणतात.

चहा करण्यासाठी जे साहित्य लागतं त्यात फारसा फरक नसला तरी चहा करण्याची रेसिपी मात्र खूप वेगळी आहे. 

साहित्य

  • पाणी - 2 कप 
  • चहा पावडर - 2 चमचे 
  • साखर- 2 मोठे चमचे 
  • दूध - 500 मिली 
  • कंडेन्स्ड मिल्क 
  • 3-4  वेलची 

कृती 

इराणी चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एक भांड घ्या,  त्यात पाणी उकळायला ठेऊन द्या आता त्यात चहा पावडर घाला आता या भांड्यावर झाकण मारून द्या .

आता तुम्हाला प्रश्न पडेल कि झाकण  ठेवलं तर जेव्हा चहा उकळू लागेल तेव्हा तो बाहेर यायची शक्यता असते पण अश्या वेळी ज्या प्रकारे बिर्याणी बनवताना आपण वाफ बाहेर जाऊ नये  म्हणून झाकणावर कणीक लावतो

तशीच कणिक लावून घ्या. आणि हे लावून जवळपास २० मिनिटं तरी उकळू द्या. या नंतर  दुसरं भांड घ्या त्यात दूध घाला ते उकळवायला ठेऊन द्या, दुधामध्ये वेलची पूड घाला आणि चांगलं ढवळून घ्या ,

दूध चांगलं तापून अर्ध होत येईल तेव्हा त्यात कंडेन्स मिल्क घाला आणि आणखी एक उकळी येउद्या,  दुसरीकडे ठेवलेल्या चहाला चांगलं आधण आलं कि त्यात साखर घाला आणि हे पाणी एका कपात गाळून घ्या

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kunal Kapur (@chefkunal)

साधारणतः अर्धा कप भरेल इतकं घ्या. आणि उरलेल्या अर्ध्या कपात उकळलेलं दूध घाला आणि चहा एकत्र मस्तपैकी हलवून घ्या आणि हा तयार झाला तुमचा गरमागरम इराणी चहा तयार ! 

चला तर मग लगेचच घरी करून पाहा आणि सर्वांची वाहवा मिळवा. 

Read More