Marathi News> भारत
Advertisement

Corona Deaths | भारतात कोरोनामुळे 4 लाखांपेक्षा अधिक जणांचा दुर्देवी अंत, सर्वाधिक मृत्यू कोणत्या देशात?

कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि  दुसऱ्या लाटेत अनेकांचा दुर्देवी अंत झाला.  

Corona Deaths | भारतात कोरोनामुळे 4 लाखांपेक्षा अधिक  जणांचा दुर्देवी अंत, सर्वाधिक मृत्यू कोणत्या देशात?
मुंबई : कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत अनेकांनी आपले कुटुंबिय, नातेवाईक आणि मित्र गमावले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मोठ्या प्रमाणावर अनेकांचा दुर्देवी अंत झाला. दरम्यान भारतात आता  कोरोनामुळे 4 लाख जणांपेक्षा अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे सर्वाधिक मृत झालेल्यांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर अमेरिका आघाडीवर आहे. (Corona deaths more than 4 lakh people in India)
 
काही तज्ज्ञांच्या मते, भारतातील मृतांचा आकडा हा 10 लाखांहून  अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
 दुसऱ्या लाटेत ३९ दिवसांत तब्बल १ लाख बळी गेलेत. अजूनही कोट्यवधी नागरिकांचं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात धोका होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. 
 
अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू 
 
कोरोनामुळे जगात आतापर्यंत  आतापर्यंत एकूण  39 लाखांपेक्षा अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक जणांचा मृत्यू झालाय. अमेरिकेत 6 लाखापेक्षा अधिकांची कोरोनामुळे प्राणज्योत माळवली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोव्हीडमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील मृतांचा आकडा हा 5 लाखांच्या वर गेला आहे.  
 
संबंधित बातम्या : 
 
दिलासादायक, महाराष्ट्रात लवकरच घरोघरी लसीकरण मोहिम सुरू
राज्यात कोरोना बळींच्या आकडेवारीत प्रचंड घोळ! हजारो मृत्यू कुणी आणि का लपवले?
Read More