Marathi News> भारत
Advertisement

कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू, देशातली पहिलीच घटना

कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. 

कोरोनामुळे आमदाराचा मृत्यू, देशातली पहिलीच घटना

चेन्नई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच देशात कोरोना व्हायरसमुळे आमदाराचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना घडली आहे. तामीळनाडूमधले द्रमुकचे आमदार जे. अंबाजगन यांचा मृत्यू झाला आहे. जे. अंबाजगन हे ६२ वर्षांचे होते. आठवड्याच्या आधी अंबाजगन यांना कोरोना संसर्ग झाला होता.

जे. अंबाजगन यांना चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंबाजगन हे चेपाक विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांना डायबेटिजचा आजारही होता. कोरोना व्हायरसनं एखाद्या आमदाराच्या मृत्यूची देशातील ही पहिली घटना आहे.

कोविड च्या काळात अंबाजगन यांनी कठोर परिश्रम केले, विशेषत: साथीच्या वेळी द्रमुकच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी कष्ट केले. पण लोकांच्या सेवेच्या वेळी दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली. अंबाजगन यांच्या मृत्यूमुळे द्रमुक ३ दिवस शोक पाळणार आहे, असं स्टॅलिन यांनी सांगितलं आहे. स्टालिन यांनी पार्टी केडरला पत्र लिहून पक्षाची सर्व कामे ३ दिवस पुढे ढकलण्यासाठी व पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत.

Read More