Marathi News> भारत
Advertisement

Corona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती

Corona Virus in India : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. 

Corona IMA Advisory: देशात लॉकडाऊन....; IMA च्या डॉक्टरांकडून ''ही'' मोठी माहिती

Corona IMA Advisory : पुन्हा एकदा कोरोनानं (Cobid 19) डोकं वर काढलं असून चीनमध्ये (China Corona) पसरलेल्या कोरोनाच्या लाटेचे पडसाद इथं भारतातही उमटताना दिसत आहेत. कोरोनाच्या “BF.7” या व्हेरिएंटचे काही रुग्ण देशात आढळल्यामुळं एकच खळबळ पाहायला मिळत आहेत. ज्यामुळं नागरिकांमध्येही पुन्हा एकदा भीतीचं वातावरण दिसू लागलं आहे. या साऱ्यामध्येच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 

देशात लॉकडाऊन लागणार का? (India Lockdown)

चीनमध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतानाच भारतामध्ये सर्वत्र सतर्कता बाळगण्यास सुरुवात झाली आहे. देशात लॉकडाऊन लागणार का, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. आता राहिला प्रश्न की खरंच भारतात Lockdown लागणार का? 

हेसुद्धा वाचा : Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू

 

Indian Medical Association कडून यासंदर्भातील चित्र अधिक स्पष्ट करण्यात आलं. डॉ. अनिल गोयल यांनी देशात लॉकडाऊन (Lockdown) लागणार की नाही यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्यातरी भारतात लॉकडाऊनसदृश्य परिस्थिती उदभवली नसल्याचं सांगितलं. 

'देशात सध्यातरी लॉकडाऊन परिस्थिती उदभवलेली नाही, कारण 95 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतलेली आहे. भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती चीनमधील नागरिकांपेक्षा जास्त चांगली आहे. त्यामुळं भारतात सध्यातरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची अंमलबजावणी, चाचण्यांमध्ये वाढ करण्याची आवश्यकता आहे', असं डॉक्टर गोयल म्हणाले. 

सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा...  

IMA कडून कोरोनाच्या धर्तीवर नागरिकांना लग्न सोहळा, राजकीय कार्यक्रम किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक मेळावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), मास्क (Mask) आणि सॅनिटायझरचा (Sanitizer) जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मास्क सक्ती? 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थान सतर्क असून, इथं दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात येत आहे. सोबतच सोशल डिस्टनसिंग सह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. तिथे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानही अलर्ट मोडवर आलं आहे. इथं मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत त्यांना मास्क मोफत वाटले जात आहेत. तर मंदिर परिसरात मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून आवाहन करण्यात येत आहे.

 

TAGS

कोरोनाकोविड १९कोरोना बातम्यामराठी कोरोना बातम्याकोरोना बातम्या महाराष्ट्रकोरोना व्हायरस बातम्याकोरोना विषयी बातम्याकोरोना ताज्या बातम्याcoronaCOVID-19Corona VirusCoroan Virus in IndiaLatest Corona UpdatesCovid 19 Latest UpdatesCovid 19 GuidelinesCoronavirus Updatecoronavirus symptomscoronavirus update maharashtraCorona Cases In IndiaCorona cases in Mumbaicoronavirus newscovid news latestcoronavirus india active casescoronavirus india new variantLockdown in IndiaIndia lockdown Newsकोरोनाकोरोना प्रतिबंधात्मक नियमकोरोना नियममास्कमास्कसक्तीमहाराष्ट्रमुंबईमराठी बातम्याबातम्याlockdownलॉकडाऊनzee 24 taas marathi news livezee 24 taas marathi newsझी मराठी बातम्याझी २४ तासझी २४ तास मराठीझी २४ तास ताज्या बातम्याआजच्या ताज्या बातम्याताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजआजच्या मराठी बातम्यामहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्याmarathi newsmarathi news todaylatest marathi newsMarathi breaking news
Read More