Marathi News> भारत
Advertisement

Corona : देशात आज अचानक का वाढला मृतांचा आकडा?

गेल्या 24 तासात 86,111 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Corona : देशात आज अचानक का वाढला मृतांचा आकडा?

मुंबई : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये ( Corona cases) वाढ झाली आहे. सक्रिय प्रकरणांमध्ये घट सुरूच आहे आणि सक्रिय प्रकरणे 233 दिवसांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहेत. केरळने शनिवारी आकडेवारीसह आदल्या दिवशी 292 मृत्यूंची नोंद केली आणि दररोज मृत्यूची संख्या वाढलीये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 16,326 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 666 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमध्ये गेल्या एका दिवसात 99 मृत्यू आणि गेल्या काही दिवसांत 292 मृत्यूंचा समावेश आहे. सक्रिय प्रकरणांमध्ये दोन हजारांहून अधिक घट झाली आहे आणि त्यांची संख्या आता 1,73,728 वर आली आहे जी एकूण प्रकरणांच्या 0.51 टक्के आहे. (covid 19 cases today in india)

शनिवारी संध्याकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 24 तासांत 8,909 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 65 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 8,780 लोक संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 86,111 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. केरळमध्ये कोरोनाचे एकूण सक्रिय 80,555 रुग्ण आहेत.

मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाविरोधी लसीचे 1057 कोटी डोस प्रदान केले आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या 12 कोटीहून अधिक लस उपलब्ध आहेत.

देशातील कोरोनाची परिस्थिती (Corona situation in india)

24 तासांत 16,326 नवे रुग्ण

एकूण सक्रिय प्रकरणे 1,73,728

24 तासात 68.48 लाख लसीकरण

एकूण लसीकरण 101.96 कोटी

शनिवारी सकाळी 08:00 पर्यंत कोरोनाची स्थिती

नवीन प्रकरणे 16,326

एकूण प्रकरणे 3,41,59,562

सक्रिय प्रकरणे 1,73,728

मृत्यू (24 तासांत) 666

एकूण मृत्यू 4,53,708

रिकव्हरी रेट 98.16 टक्के

मृत्यू दर 1.33 टक्के

पॉझिटिव्हीटी दर 1.20%

शनिवारी संध्याकाळी 06:00 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती लसीकरण

तामिळनाडू 15.31 लाख

बंगाल 11.14 लाख

उत्तर प्रदेश 8.32 लाख

महाराष्ट्र 5.19 लाख

मध्य प्रदेश 3.82 लाख

बिहार 2.75 लाख

गुजरात 2.69 लाख

राजस्थान 1.04 लाख

पंजाब 0.87 लाख

छत्तीसगड 0.86 लाख

हरियाणा 0.80 लाख

दिल्ली 0.73 लाख

झारखंड 0.65 लाख

जम्मू-काश्मीर 0.36 लाख

उत्तराखंड 0.33 लाख

हिमाचल 0.29 लाख

Read More