Marathi News> भारत
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये १ ऑक्टोबरपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रातही निर्णय ?

महाराष्ट्रातही थिएटर उपस्थित होणार का ? असा प्रश्न

पश्चिम बंगालमध्ये १ ऑक्टोबरपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रातही निर्णय ?

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात सर्व सिनेमा हॉल, नृत्य गायन आणि मॅजिक शो सुरु करण्यास परवानगी दिली आहे. १ ऑक्टोबरपासून पश्चिम बंगालमध्ये थिएटर सुरु होणार आहेत. पण इथली उपस्थिती केवळ ५० टक्के इतकीच असणार आहे. महाराष्ट्रातही थिएटर उपस्थित होणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.

ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. सामान्य स्थितीत परतण्यासाठी जत्रा, नाटक, मॅजिक शो, सिनेमा हॉल, संगीत नृत्य-गायन १ ऑक्टोबरपासून ५० टक्के उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी दिली जात आहे. असे ट्वीट ममता बॅनर्जी यांनी केलंय. 

सोशल डिस्टन्सिंग, मास्क तसेच कोरोनापासून वाचण्याच्या अटींचे पालन करुन ही परवानगी दिली जाणार आहे. 

राज्यातील सर्व सिनेमा हॉल, थिएटर कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आले. थिएटर सुरु करावेत अशी मागणी विविध राज्यातील कलाकार, प्रेक्षक करत आहेत. पश्चिम बंगालने यासाठी पुढाकार घेतलाय. आता या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातही थिएटर सुरु होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Read More