Marathi News> भारत
Advertisement

Coronavirus : भारतात सापडले 120हून अधिक म्युटन, 8 सर्वात खतरनाक

देशभरात 28 लॅबमध्ये होतेय सिक्वेंसिंग 
 

Coronavirus : भारतात सापडले 120हून अधिक म्युटन, 8 सर्वात खतरनाक

मुंबई : देशभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे (Coronavirus) 38 करोडहून अधिक सँपलचे टेस्ट झाले आहेत. मात्र यामध्ये केवळ 28 हजार जीनोम सीक्वेंसिंग आतापर्यंत (Genome Sequencing) झाले आहेत. या अभ्यासात समोर आलं आहे की, कोरोना व्हायरसचे 120 हून म्युटेशन (Mutation) आतापर्यंत भारतात मिळत आहेत. यामधील 8 म्युटेशन अधिक खतरनाक आहेत. संशोधक अजून 14 म्युटेशनची तपासणी करत आहेत. 

देशभरात 28 लॅबमध्ये होतेय सिक्वेंसिंग 

WHO ने या खतरनाक वेरिएंट्सला नावे दिली आहे. एल्फा, बीटा, गामा, डेल्टा प्लस, कापा, ईटा आणि लोटा अशी नावे दिली आहेत. हे सगळे वेरिएंट देशभरात मिळाले आहेत. या वेरिएंटमध्ये काही केस अधिक आहेत तर काही केस कमी आहेत. देशभरात 28 लॅबमध्ये याची सिक्वेंसिंग सुरू आहे. वेरिएंटचे प्राथमिक रिपोर्ट खूप धक्कादायक आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डेल्टासोबतच कापा वेरिएंट आहे. गेल्या 60 दिवसांत 76 टक्के सँपलमध्ये याचा शोध लागला आहे.

जीनोम सिक्वेंसिंग का महत्वाचं आहे? 

जीनोम सिक्वेंसिंगच्या मदतीनेच वैज्ञानिक कोरोना व्हायरसमध्ये होणारे बदल स्विकारण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील 5 टक्के सँपल जीनोम सिक्वेंसिंग होणं गरजेचं आहे. मात्र आता हे 3 टक्के देखील झालेली नाही. 

एँटीबॉडीवर हल्ला करतात म्युटेशन 

देशभरात आतापर्यंत 28 हजार 43 सँपलची जीनोम सिक्वेंसिंग आली आहे. ज्यामध्ये डेल्टा प्लस आणि कापाचे गंभीर म्युटेशन मिळाले आहेत. संशोधकांनी डेल्टा प्लस, बीटा आणि गामा म्युटेशन सगळ्यात धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं. म्युटेशन अतिशय वेगाने पसरतोय आणि लोकांच्या एँटीबॉडीवर हल्ला केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या म्युटेशनवर संशोधक अभ्यास करत आहेत. 

60 दिवसांत 76 टक्के सँपलमध्ये डेल्टा वेरिएंट मिळाले आहेत. तेथेच आठ टक्के सँपलमध्ये कापा वेरिएंट सापडला आहे. कोरोना खूप पटापट आपलं रूप बदलत आहेत. या व्यतिरिक्त 5 टक्के सँपलमध्ये एल्फा वेरिएंट मिळालं आहे. 

Read More