Marathi News> भारत
Advertisement

श्री श्री रवीशंकरांंच्या उपस्थितीत ट्रेनमध्ये पार पडला पहिला लग्न सोहळा

भारतामध्ये 'लग्न' हा सोहळा असतो. अनेक दिवस चालणारे विधी सोहळे हे भारतीय लग्न पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. परंतू नुकतेच भारतीय रेल्वेमध्ये एक लग्न पार पाडल्याची घटना आहे. 

श्री श्री रवीशंकरांंच्या उपस्थितीत ट्रेनमध्ये पार पडला पहिला लग्न सोहळा

मुंबई : भारतामध्ये 'लग्न' हा सोहळा असतो. अनेक दिवस चालणारे विधी सोहळे हे भारतीय लग्न पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. परंतू नुकतेच भारतीय रेल्वेमध्ये एक लग्न पार पाडल्याची घटना आहे. 

श्री श्री रवीशंकरच्या उपस्थितीमध्ये लग्न 

आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी सचिन कुमार आणि जोत्सना सिंह या जोडीचे लग्न लावले आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशलमीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आले  आहेत.  लखनऊ गोरखपूर दरम्यान ट्रेनमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे.

 

साधेपणाने लग्न करा - श्री श्री रवीशंकर

लग्नासारखा विधी अत्यंत साधेपणाने करण्याचा सल्ला रवीशंकर यांनी दिला आहे. त्यांच्या अनुयायाने सचिन आणि जोत्सनाच्या लग्नाचे फोटो शेअर करताना अशाप्रकारे ट्रेनमध्ये होणारा हा पहिला विवाह सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

Read More