Marathi News> भारत
Advertisement

लालूंनतर आता मुलगी आणि जावई अडचणीत

लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, जावई शैलेश कुमार यांच्यासह आणखी काही लोकांवर दिल्लीच्या पटियाला कोर्टात ईडीने मनी लाउंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. 

लालूंनतर आता मुलगी आणि जावई अडचणीत

नवी दिल्ली : लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, जावई शैलेश कुमार यांच्यासह आणखी काही लोकांवर दिल्लीच्या पटियाला कोर्टात ईडीने मनी लाउंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. 

कोर्टाने लालू प्रसाद यांची मुलगी आणि जावई यांना समन्स पाठवला आहे. 8000 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सीबीआय कोर्टाने मीसा भारती आणि शैलेश कुमार यांना 5 मार्च, 2018 पर्यंत हजर राहण्यास सांगितलं आहे.

कोर्टाच्या या आदेशानंतर मीसा भारती यांच्या अडचणी आता वाढणार आहे. कोर्टात त्यांना आता हजर राहावं लागणार आहे. मीसा भारती, शैलेश कुमार यांच्या शिवाय संतोष शाह नावाच्या उद्योगपतीला देखील कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.

Read More