Marathi News> भारत
Advertisement

Covid Vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाला या राज्याची मंजुरी, किती डोस देणार वाचा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Covid Vaccination : लहान मुलांच्या लसीकरणाला या राज्याची मंजुरी, किती डोस देणार वाचा

Covid Vaccination Update : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. आता लवकरच 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांचं लसीकरण केलं जाणार आहे. यात आजारी, अपंग बालकांचं प्राधान्याने लसीकरण केलं जाईल. उत्तर प्रदेश सरकारने 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना Zycov-D लस देण्यास मान्यता दिली आहे. ही लसीकरण मोहिम राज्यातील गोरखपूरसह 11 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सर्वात जास्त धोका 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना आहे. या पार्श्वभूमीवर खबरदाराची उपाय म्हणून योगी सरकारने लहान मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्रीय आरोग्य विभागाने नुकतंच Zycov-D या Zydus आणि Cadila ने बनवलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. ही लस 12 वर्षे ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना दिली जाऊ शकते. एका मुलाला तीन डोस दिले जाणार आहेत. यासाठी आजारी, अपंग आणि असहाय बालकांची ओळख पटवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकार लवकरच लस खरेदी करणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. एन के पांडे यांनी दिली आहे. लस देण्याची सध्या कोणतीही मार्गदर्शक तत्व नाहीत. योगी सरकारतर्फे एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात Zycov-D लस देण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. मुलांच्या लसीकरणाआधी मार्गदर्शक तत्वही जारी केली जातील.

Read More