Marathi News> भारत
Advertisement

डॉक्टर पुतण्याने औषध दिलं आणि तिचे हात पाय सुन्न झाले, मग तिला बेडवर झोपवलं आणि...

 नात्याला कळीमा लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून तुम्हाला देखील विश्वस बसणार नाही.

डॉक्टर पुतण्याने औषध दिलं आणि तिचे हात पाय सुन्न झाले, मग तिला बेडवर झोपवलं आणि...

मुंबई : नात्याला कळीमा लावणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जो ऐकून तुम्हाला देखील विश्वस बसणार नाही. आपण बऱ्याचदा आपल्या नात्यातील व्यक्तीवर डोळेबंद करुन विश्वास ठेवतो. परंतु काही लोक आपल्या नात्याचा जराही विचार करत नाहीत आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन फसवणूक करतात. हे प्रकरण देखील असंच आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर पुतण्या आपल्या काकीसोबत वाईट कृत्य करतो. खरंतर या डॉक्टर पुतण्याने आपल्या काकीला एक औषध दिली आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आ

पोलिसांत नोंदवलेल्या अहवालात पीडितेने आरोप केला आहे की, ती एके दिवशी आजारी पडली होती. त्यावेळी ती तिच्या मोठ्या दिराच्या मुलाच्या दवाखाण्यात गेली. नात्यातील व्यक्ती डॉक्टर आहे म्हटल्यावर सहाजिक लोक तेथे जाणार. अशी ही महिला देखील गेली. परंतु तिला कुठे माहित होतं तिच्यासोबत असा प्रकार घडणार आहे.

या पुतण्याने आपल्या काकीला शितपेय आणि गोळी दिली. तिने देखील कसला ही विचार न करता ती गोळी घेतली. परंतु या नंतर काही वेळातच महिलेचे हातपाय सुन्न होऊ लागले आणि तिला गाठ झोप लागली.

त्यानंतर आरोपीने आपल्या काकीला मेडिकल बेडवर झोपवले आणि तिचा विनयभंग केला, तसेच तिच्यावर बलात्कार केला.

काही वेळाने जेव्हा पीडितेला जाग आली तेव्हा तिच्यासोबत काहीतरी विचित्र घडल्याचे तिला जाणवले. तिने जेव्हा तिच्या डॉक्टर पुतण्याला याबाबत विचारले, तेव्हा त्याने तिला शांत राहण्यास सांगितले आणि तिला बदनामीचं कारण सांगत धमकावले, ज्यानंतर ही पीडित महिला शांत बसली.

परंतु हद्द तेव्हा झाली, जेव्हा एका कुटूंबातील लग्नात ते दोघेही पुन्हा भेटले. येथे आरोपीने आपल्या काकीच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या काकाला आपल्या स्वत:च्या वडिलांना भेटण्यासाठी जाण्यास सांगितले आणि काकू एकटी असल्याचे पाहून तिला पुन्हा धमकी देऊ लागला.

हा पुतण्या त्या दिवशी घडलेल्या घटनेचे फोटो दाखवून आपल्या काकूला पुन्हा एकदा शरीरसंबंध ठेवण्यासाठी सांगू लागला, एवढंच नाही तर तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. ज्यानंतर या महिलेनं पोलिसांत धाव घेतली आणि आपल्या पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या पुतण्याला अटक केले आणि घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Read More