Marathi News> भारत
Advertisement

प्रियकराने पतीसमोरच S*x चा केला हट्ट; दांपत्याने त्याचे कपडे उतरवून...

Crime News: एक अज्ञात मृतदेह जंगलात सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली अन्...

प्रियकराने पतीसमोरच S*x चा केला हट्ट; दांपत्याने त्याचे कपडे उतरवून...

Crime News: मध्य प्रदेशमधील गुना येथे एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. येथील एका दांपत्याने महिलेचे प्रियकराची हत्या करुन त्याची हत्या केली. यानंतर या पती-पत्नीने मृतदेह जंगलात फेकून दिला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थली दाखल झाले असून त्यांनी प्रकरणाचा पंचनामा केला. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवल्याने आरोपींपैकी महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. मयत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

पती तुरुंगात अन् पत्नीचे विवाहबाह्य संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, भारती दोहरे नावाच्या महिलेने तिचा पती शिवराज दोहरेसोबत पिपरौदा येथे वास्तव्यास आहे. काही काळापूर्वी शिवराज एका प्रकरणात तुरुंगाची हवा खाऊन आला. त्यावेळी भारती अन्य एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. भारतीने आनंद जाटव नावाच्या पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले. दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंधही ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे शिवराज तुरुंगातून सुटून आल्यानंतरही आनंद जाटव हा भारतीला भेटायला यायचा.

पती घरी असतानाच तो घरी आला अन्...

एका रात्री मद्यधुंदावस्थेत आनंद हा भारतीचा पती घरी असतानाच तिच्या घरी पोहचला. पतीच्या समोरच त्याला भारतीबरोबर शरीरसंबंध ठेवायचे होते. यानंतर भारतीचा पती शिवराजने आनंदला कपडे काढण्यास सांगितलं. दारुच्या नशेत असलेल्या आनंदने कपडे काढले. त्यानंतर शिवराजने पत्नीकडील शाल घेऊन आनंदचा गळा दाबून त्याची हत्या केली. आनंदची हत्या केल्यानंतर पती-पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जंगलात फेकून घरातून पळ काढला.

पोलिसांना माहिती मिळाली अन्...

काही वेळानंतर स्थानिक पोलिसांना बिलोनिया येथील जंगलात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी यानंतर जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीमधून तपास केला. त्यावेळी हत्येचा खुलासा झाला. या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भारतीकडे तपास केला असता आधी ती उडावउडवीची उत्तरं देत होती. तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचा खाक्या दाखवल्यानंतर तिने आपला गुन्हा मान्य केला. 

पत्नीने सांगितलं नेमकं काय घडलं?

पती शिवराज जेव्हा तुरुंगात होता तेव्हा मी आनंदबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले होते, अशी कबुली भारतीने पोलिसांना दिली. काही दिवसांपूर्वीच भारतीचा पती जामीनावर तुरुंगाबाहेर आला होता. त्यानंतर आनंदचं घरी येणं-जाणं सुरुच होतं. 25 फेब्रुवारी रोजी आनंद मद्यपान करुन नशेतच भारतीच्या घरी आला आणि पती शिवराजसमोरच तो भारतीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा बोलून दाखवली आणि आताच्या आता आपल्याला शरीरसंबंध ठेवायचे आहेत यावर तो अडून बसला. त्यानंतर भारती आणि तिच्या पत्नीने आनंदच्या हत्येचा कट रचून त्याची हत्या केली.

Read More