Marathi News> भारत
Advertisement

विकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...

Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावानेच मुलीवर बलात्कार केला आहे. 

विकृतीचा कळस! वडिलांकडून मुलीवर वारंवार बलात्कार, मदतीसाठी भावाकडे गेली पण त्यानेही...

Crime News Today: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळं संपूर्ण शहर हादरले आहे. 15 वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी व भावाने बलात्कार केला आहे. इतकंच नव्हे तर पीडित मुलीच्या भावाने तिचा अश्लील व्हिडिओदेखील बनवला आहे. तो व्हिडिओ दाखवून त्याने तिला वारंवार धमकावले आहे. पीडीतेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची आई त्यांच्या कुटुंबापासून वेगळी राहत होती. ती ओडिशा येथे राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिची आई गेल्यानंतर वडिल मुलीवर वारंवार बलात्कार करत होते. वडिलांच्या या अत्याचाराला कंटाळून तिने तिच्या मोठ्या भावाला आपबीती सांगितली आणि त्याच्याकडे मदत मागितली. मात्र, तिची मदत करण्याऐवजी त्यानेच तिच्यावर अत्याचार केला. त्याने त्याचा व्हिडिओदेखल बनवला होता. 

पिडीतेचा मोठा भाऊदेखील वारंवार तिच्यावर बलात्कार करत होता. तसंच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला वैतागून पीडितेने तिच्या दुसऱ्या भावाला याबाबत सांगितले. त्यानंतर दोघानीही गुरुवारी पोलिसांसोबत संपर्क साधून तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, या आधीही मध्य प्रदेशात असाच एक प्रकार उघडकीस आला होता 40 वर्षांचा व्यक्ती त्याच्या 21 वर्षीय मुलीवर सलग चार वर्ष बलात्कार करत होता. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मुलीचे वय 18 पेक्षा कमी होते तेव्हापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. बापाच्या त्रासाला वैतागून मुलीने आईकडे तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिस पीडितेच्या आईचीदेखील चौकशी करत आहेत. 

Read More