Marathi News> भारत
Advertisement

सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...

Crime News : महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या बाबतीच घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील काही काळापासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.   

सत्संगला येणाऱ्या अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याने खळबळ! समोर आलं धक्कादायक सत्य; सेवादार प्रसादातून...

Crime News : महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये सातत्यानं वाढ होत असून, उत्तर प्रदेशातून अशीच मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. बुलंदशहर येथील स्याना पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या राधास्वानी सत्संग व्यास परिसरात खेळण्यासाठी म्हणून येणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. 

सत्संगमध्ये असणाऱ्या 65 वर्षीय सेवादारावर या मुलींवर मागील 8 महिन्यांपासून प्रसादातून नशेच्या गोड गोळ्या देण्याच्या बहाण्यानं अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. दोन मुलींपैकी एकीच्या घरी ती चार वर्षांची गरोदर असल्याचा खुलासा होताच घरातील मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली. ज्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. 

घटनाक्रम मन विषण्ण करणारा 

बुलंदशहर जनपद येथील स्याना पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या एका खेडेगावातील दोन 14 वर्षीय मुली, (साधारण 6 वी आणि 7 वीच्या विद्यार्थिनी) या दोघीही दोन वेगवेगळ्या कुटुंबातील. या मुली दररोज गावापाशी असणाऱ्या राधास्वामी सत्संग व्यास येथील परिसरात खेळण्यासाठी जात होत्या. तिथंच काम करणाऱ्या एका सेवादारानं त्या दोघींना नशेच्या गोड चवीच्या गोळ्या देत याचंच आमिष त्या मुलींना दाखवून त्यांच्यावर बलात्कार केला. जवळपास 8 महिने सेवादारानं हे दुष्कृत्य सुरूच ठेवलं होतं. 

प्रकरण त्या क्षणी प्रकाशात आलं जेव्हा इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीच्या पोटात वेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी तिला डॉक्टरांकडे नेलं असता तिथंच ती चार महिन्यांची गरोदर असल्याची खळबळजनक बाब समोर आली. ज्यावेळी कुटुंबीयांनी त्या मुलीला या प्रकरणाची सविस्तर माहिती विचारली तेव्हा तिनं घडला प्रकार सर्वांपुढं आणला. 

हेसुद्धा वाचा : हाच का अतुल्य भारत? इंडिया गेटजवळ रशियन महिलेपुढं अश्लील डान्स, म्हणे 'यही वाली...'

आपल्यासोबत आणखी एक मुलगी असल्याचंही त्या मुलीनं सांगितलं. ज्यानंतर दुसऱ्या अल्पवयीन मुलीचीही चौकशी करण्यात आली. तिच्याकडूनही अशीच माहिती मिळाली असता तातडीनं पोलीस तक्रार दाखल करत आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आणि दोन्ही मुलींना वैद्यकिय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. सध्या याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याची उकल करण्यास सुरुवात केली आहे. 

Read More