Marathi News> भारत
Advertisement

Insta वर ओळख, लिव्ह इन अन् मर्डर... CRPF जवानाने महिला पोलीस अधिकाऱ्याला संपवलं; हत्या केल्यानंतर...

CRPF Jawan Kills ASI Partner: हा सारा प्रकार गुजरातमध्ये घडला असून आरोपी आणि मयत महिला दोघेही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते अशी माहिती समोर येत आहे.

Insta वर ओळख, लिव्ह इन अन् मर्डर... CRPF जवानाने महिला पोलीस अधिकाऱ्याला संपवलं; हत्या केल्यानंतर...

Gujrat Crime CRPF Jawan Kills ASI Partner: गुजरातमधील कच्छ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याची शुक्रवारी रात्री तिच्या लिव्ह-इन पार्टनर असलेल्या सीआरपीएफ जवानानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सीआरपीएफ जवानाने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण देखील केलं आहे.

नेमकं घडलं काय?

या प्रकरणातील आरोपीचं नाव दिलीप डांगचिया असं आहे. तर मयत महिला अधिकारी ही अंजार पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत होती. मयत महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव अरुणा जाधव असं असून ती अवघ्या 26 वर्षांची होती. दिलीपने गळा दाबून अरुणा यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. आरोपीने पोलीस स्थानकामध्ये जाऊन आत्मसमर्पण केल्यानंतर, या घटनेचा खुलासा झाला. सदर घटनेची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजताच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी जवान हा गुजरात पोलीस दलाच्या सीआरपीएफ तुकडीमध्ये कार्यरत होता. आरोपी जवानाचे एएसआय असलेल्या महिला अधिकाऱ्याशी प्रेम संबंध होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांच्या दोघांमध्ये जोराचं भांडण झाल्याचं सांगितलं जात आहे. दोघांत झालेल्या वादानंतर आरोपी जवानाने एएसआय असलेल्या महिला अधिकाऱ्याचा गळा दाबून हत्या केली. मृत अरुणा जाधव ही कच्छ (पूर्व) पोलिसांच्या अंजार विभागातील अंजार पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत होती. 


पोलिसांचं म्हणणं काय?

दरम्यान, अंजार विभागाचे पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) मुकेश चौधरी यांनी सदर घटनेची माहिती दिली आहे. “अरुणा आणि दिलीप 2021 मध्ये इंस्टाग्रामद्वारे संपर्कात आले होते. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. शुक्रवारी रात्री 10 वाजता त्यांच्यात भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. तसेच आरोपी जवान दिलीप डांगचियाने शनिवारी अंजार पोलीस ठाण्यात गेला, जिथे त्याने स्वतःला अधिकाऱ्यासमोर आत्मसमर्पण केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत,” असं चौधरी यांनी स्पष्ट केलंय.

ते भांडण कशावरुन?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मयत महिलेच्या कुटुंबाला घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस या घटनेसंदर्भातील सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा रात्री उशिरा अरुणा आणि तिचा मित्र दिलीप डांगचिया यांच्यात कशावरून तरी जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तिची घरी गळा दाबून तिची हत्या केली. हे भांडण नेमकं कशावरुन झालेलं याचा शोध आता पोलीस दिलीपच्या चौकशीदरम्यान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read More