Marathi News> भारत
Advertisement

6 जुलै! याच तारखेकडे साऱ्या देशाचं लक्ष; भारतात नेमकं काय घडणार? चीनलाही लागली चिंता

India Latest News : जुलै महिना भारतासाठी महत्त्वाचा. चीनसुद्धा चिंतेत. असं नेमकं काय घडणार? 6 जुलै! याच तारखेकडे साऱ्या देशाचं लक्ष  

6 जुलै! याच तारखेकडे साऱ्या देशाचं लक्ष; भारतात नेमकं काय घडणार? चीनलाही लागली चिंता

India Latest News : 6 जुलै या तारखेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून, प्रामुख्यानं चीनकडूनही या दिवशी भारतात नेमकं काय घडणार यावर लक्ष ठेवलं जाणार आहे. यामागचं नेमकं कारण, अनेकांच्याच भुवया उंचावून जात आहे. उपलब्ध माहितीनुसार तिबेटियन समुदायाचे सर्वोच्च अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांचा उत्तराधिकारी नेमका कोण असेल हा प्रश्न मागील काही वर्षांपासून सातत्यानं उपस्थित केला जात होता. 

फक्त भारतच नव्हे, तर चीन आणि जपाननंसुद्धा या मुद्द्यांमध्ये रस दाखवला असून, आता खुद्द दलाई लामाच 6 जुलै रोजी म्हणजेच त्यांच्या जन्मदिनी वयाच्या 90 वर्षी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सध्या हिमाचल प्रदेशातील मॅक्लोडगंज इथं दलाई लामा यांच्या वाढदिवसासाठीच्या तयारीला सुरूवात झाली असून, शेजारी राष्ट्र चीननंही या होऊ घातलेल्या समारंभावर लक्ष ठेवलं आहे. कारण, चीनकडूनही दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. 

दलाई लामांनी दिले होते संकेत... 

प्रत्यक्षात तिबेटन बौद्ध समुदायाकडून पुढील धर्मगुरूंची निवड विद्यमान दलाई लामांच्या निधनानंतर केली जाते. मात्र 14 वे दलाई लामा यांनी दिलेल्या संकेतांनुसार ते हयातीतच आपला उत्तराधिकारी घोषित करतील. 2025 मधील मार्च महिन्यात त्यांनी आपल्या 'वॉईस फॉर द वॉईसलेस' (Voice for the Voiceless) या पुस्तकामध्ये दिलेल्या संकेतांनुसार त्यांचा उत्तराधिकारी आणि पुढील दलाई लामा हा चीनच्या बाहेर जन्मलेला असेल. इतकंच नव्हे तर आपल्या 90 व्या वाढदिवसाच्या दिनी त्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आपण देणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. 

चीनशी मतभेद अन् दलाई लामा भारतात... 

चीनमधील तत्वकालीन सरकारसोबतच्या विरोधानंतर दलाई लामा त्यांच्या हजारो अनुयायांसह भारतात आले होते. तेव्हापासूनच निर्वासित तिबेटन समुदायासाठी भारतानं एक मोठा आसरा दिला. तिबेटी बौद्ध धार्मिक परंपरांवर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तेव्हापासूनच प्रयत्नही सुरू झाले. दरम्यान सध्याच्या घडीला दलाई लामा यांनी दिलेल्या संकेतांनंतर चीनचा आणखी तिळपापड झाला असून, चिनी सरकार आणि मुळचे तिबेटीय नागरिकच पुढील लामा निवडणार असाच सूर चीननं आळवला आहे. 

चीनच्या मते किंग वंशच्या 1793 पासूनच्या परंपरेनुसार संभाव्य दावेदारांमधून नव्या लामाची निवड होईल आणि चीनच्या नजीकच असणाऱ्याच एखाद्या भागातील व्यक्ती पुढील लामा असेल. चीनचे राष्ट्रीय कायदे आणि आदेशांनुसारच ही प्रक्रिया होईल या भूमिकेवर चीन ठाम असून, आता येत्या काळात या वादाच्या विषयावर 6 जुलैला नेमका कसा आणि कोणता तोडगा निघतो याकडेच साऱ्या जगाचं लक्ष असेल. 

Read More