Marathi News> भारत
Advertisement

IPO आधीच LIC ला मोठा झटका; तुमचीही पॉलिसी असेल तर वाचा?

LIC IPO Update : देशातील अनेक गुंतवणूकदार सर्वात मोठ्या IPO (LIC IPO Date) ची वाट पाहत आहे. त्या आधीच एलआयसीबाबत मोठी बातमी आली आहे.

IPO आधीच LIC ला मोठा झटका; तुमचीही पॉलिसी असेल तर वाचा?

नई दिल्ली: LIC IPO Update : देशातील अनेक गुंतवणूकदार सर्वात मोठ्या IPO (LIC IPO Date) ची वाट पाहत आहे. या IPO द्वारे, एलआयसीचे 31.6 कोटी शेअर्स म्हणजेच 5% शेअर्स विकले जातील. हा IPO पूर्णपणे OFS असेल, त्यात नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. किरकोळ गुंतवणूकदारांना या मेगा IPO मध्ये 35% पर्यंत भाग राखीव असेल. मात्र आयपीओ येण्यापूर्वीच एलआयसीला मोठा झटका बसला आहे. कोविड-19 (COVID-19) महामारीचा एलआयसीवर परिणाम झाला आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या पॉलिसी विक्रीत घट झाली आहे आणि अधिक मृत्यूचे क्लेम द्यावे लागले आहेत. अशा परिस्थितीत एलआयसीवर आर्थिक बोजा पडला आहे. LIC आयपीओ लवकरच येणार आहे. आयपीओपूर्वी एलआयसीसाठी हे आकडे योग्य संकेत नसल्याचे म्हटले जात आहे.

एलआयसीला मोठा धक्का

LIC ने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 महामारीमुळे वैयक्तिक आणि समूह पॉलिसींच्या एकूण संख्येत घट झाली आहे. कोरोना काळात मृत्यू विम्याच्या दाव्यांमध्येही वाढ झाली आहे. म्हणजेच एलआयसीवरील आर्थिक बोजा वाढला आहे.

 

Read More