President Droupadi Murmu Crying: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 20 जून रोजी 67 वा वाढदिवस साजरा केला. मुर्मू यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींच्या सक्षमीकरण उभारण्यात आलेल्या देहरादून येथील राष्ट्रीय संस्थेला भेट दिली. यावेळी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये एका क्षणी राष्ट्रपती मुर्मू अत्यंत भावूक झाल्याचं दिसून आलं. मुर्मू अचानक रडू लागल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी तैनात व्यक्तीने त्यांना डोळे पुसण्यासाठी रुमाल दिला.
देहराडूनमधील या संस्थेट दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या दिवशीच संस्थेला भेट देणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू यांना शुभेच्छा देण्यासाठी एक खास गाणं गायलं. "बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गये, आप जियो हजारों साल, ये मेरी है आरजू," हे हृदयस्पर्शी गाणं या मुलांनी राष्ट्रतींसमोर गायले. त्यावेळी मंचावर बसलेल्या राष्ट्रपती मुर्मू अत्यंत भावूक झाल्या. त्यांनी चष्मा बाजूला सारुन डोळे पुसण्यास सुरुवात केली. पाहता पहाता अचानक मुर्मू खुर्चीवर बसल्या बसल्या रडू लागल्या. काही क्षण त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्यांना कळलं नाही की त्या रडत आहेत. मात्र जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा एका अधिकाऱ्याने मुर्मूंसमोरच्या टेबलवरील रुमाल उचलून आश्रू पुसण्यासाठी त्यांच्या हातात दिला.
राष्ट्रपती मुर्मू बराच वेळ आपल्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. मात्र त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होते. त्यांनी रुमालाने डोळे पुसण्याचा प्रयत्न केला. त्या बराच वेळ डोळे पुसत होत्या. मुर्मू यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी मुर्मू यांना त्यांच्या मुलांची आणि पतीची आठवण झाली असेल असं या व्हिडीओसंदर्भात म्हटलं आहे.
President #DroupadiMurmu gets emotional as students of the National Institute for the Empowerment of Persons with Visual Disabilities, Dehradun, sing a heartfelt birthday song for her. pic.twitter.com/Ls2nY7UR5E
— All India Radio News (@airnewsalerts) June 20, 2025
राष्ट्रपतींनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणामध्ये दिव्यांग व्यक्तींबरोबर देश कसा वागतो यावरुन त्याची आणि समाजाची प्रगती कशी झाली आहे याचं मोजमापन करता येतं, असं म्हटलं. सर्वांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिव्यांगजनांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, असं आवाहन मुर्मू यांनी यावेळी भाषणामध्ये केले.